मराठवाड्यात सिग्मा हाॅस्पिटलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:02 AM2021-06-11T04:02:02+5:302021-06-11T04:02:02+5:30
औरंगाबाद : रोबोटिक सर्जरीला वैद्यकीय क्षेत्रातील भविष्य म्हणून पाहिले जाते. शहरातील सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटलने मराठवाड्यात पहिल्यांदा रोबोटिक ...
औरंगाबाद : रोबोटिक सर्जरीला वैद्यकीय क्षेत्रातील भविष्य म्हणून पाहिले जाते. शहरातील सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटलने मराठवाड्यात पहिल्यांदा रोबोटिक सर्जरी युनिट सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात आता रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे-मुंबईत जाण्याची गरज राहणार नाही.
रोबोटिक शस्त्रक्रियाचा मुख्य फायदा म्हणजे ही पद्धत अगदी अचूक आहे. ही शस्त्रक्रिया रोबोटच्या मदतीने केली जाते. त्यामुळे या काळात व्यक्तीला कोणत्याही प्रकारची वेदना होत नाही. इतर शस्त्रक्रियेच्या तुलनेत, रोबोटिक शस्त्रक्रियेत एक छोटासा कट केला जातो. हे कट भरायला जास्त वेळ लागत नाही. अशा शस्त्रक्रियेमध्ये शरीरावर कमी घाव होतात. त्यामुळे जखम मोठी होत नाही. रुग्णाच्या प्रकृतीत जलद सुधारणा होते. पुण्यातील प्रख्यात कॅन्सरतज्ज्ञ व कॅन्सर सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर हे रोबोटिक सर्जरी करण्यासाठी ‘सिग्मा’च्या चमूमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक सर्जरीचे पहिले स्टेशन २६ व २७ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभा घ्यावा, असे आवाहन सिग्मा ग्रुपच्या वतीने डाॅ. उन्मेष टाकळकर, डाॅ. मनीषा टाकळकर, डाॅ. अजय रोटे यांनी केले आहे.
फोटो ओळ...
रोबोटिक सर्जरी युनिटसह सिग्मा हाॅस्पिटलमधील तज्ज्ञ डाॅक्टर आणि कर्मचारी.