मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी स्वाक्षरी मोहीम; एक लाख सह्यांचे निवेदन
By Admin | Published: May 2, 2017 11:44 PM2017-05-02T23:44:00+5:302017-05-02T23:46:58+5:30
लातूर : रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जात असून, गेल्या दोन दिवसांत २५ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत.
लातूर : रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जात असून, गेल्या दोन दिवसांत २५ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. लातूर शहरातील प्रत्येक प्रभागांतून नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत. एक लाख सह्यांचे निवेदन रेल्वे मंत्र्यांना देऊन लातूरकरांच्या भावना कळविल्या जाणार आहेत.
मुंबई-लातूर रेल्वेचे विस्तारीकरण बीदरपर्यंत झाले आहे. या विस्तारीकरणाला रेल्वे बचाव कृती समितीने तीव्र विरोध दर्शविला असून, रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे. शिवाय, एकदिवसीय धरणे आंदोलनही करण्यात आले असून, आता स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे. सोमवारी ५ नंबर चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
गांधी चौक, गंजगोलाई परिसरातही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली असून, गेल्या दोन दिवसांत शहरातील २५ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. ६ मेपर्यंत ही मोहीम राबवून एक लाख सह्यांचे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती मोईज शेख यांनी दिली. (प्रतिनिधी)