कोरोनाकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लक्षणीय कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:05 AM2021-03-27T04:05:12+5:302021-03-27T04:05:12+5:30
औरंगाबाद: कोरोनाकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मराठवाडा व खान्देशमध्ये लक्षणीय सेवाकार्य केले असून देवगिरी प्रांतानेही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे, अशी ...
औरंगाबाद: कोरोनाकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मराठवाडा व खान्देशमध्ये लक्षणीय सेवाकार्य केले असून देवगिरी प्रांतानेही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे, अशी माहिती देवगिरी प्रांताचे कार्यवाह हरीश कुलकर्णी, सहकार्यवाह विलास दहिभाते व शहर प्रचारप्रमुख संतोष तिवारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाकाळात देवगिरी प्रांतात आठ लाख ४५ हजार जणांना सेवा पोहोचविण्यात आली होती. त्यामध्ये पाच लाख ५८ हजार जणांना घरोघरी किंवा रुग्णालयात जाऊन फूड पॅकेट देण्यात आले. २४ हजारांहून अधिक ठिकाणी कोरोना संक्रमणापासून काळजी कशी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यात आली. त्रेचाळीस हजारांहून अधिक ठिकाणी किराणा सामान कीट वाटप करण्यात आले. तर जवळपास चार हजारांहून अधिकृत स्वयंसेवकांनी रक्तदान केले. तसेच ठिकठिकाणी स्वास्थ्य सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात आले. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस व स्वच्छता कर्मचाऱ्यांना देवगिरी प्रांतात सव्वीस हजारांपेक्षा अधिक कप चहाचे वाटप करण्यात आले. तर जवळपास ९० हजार जणांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. दहा हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष सेवाकार्यात सहभाग घेतला.
देवगिरी प्रांतात श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाच्या माध्यमातून ४५ कोटी रुपये इतका निधी संकलित करण्यात आला, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
बंगळुरू येथे पार पडलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेत देवगिरी प्रांतातून विलास दहिभाते यांच्यासह जळगावचे राजेश पाटील, लातूरचे पुरुषोत्तम कुलकर्णी व नांदेडचे इंद्रजित बैस यांनी सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले.