माळीवाड्यातील आदिवासी बांधवांच्या घरकुल योजनेला ब्रेक लागण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:04 AM2021-08-01T04:04:17+5:302021-08-01T04:04:17+5:30

दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत माळीवाडा येथील २७ घरकुले मंजूर करण्यात आली. गट क्र. १८७ मध्ये सोळा हजार ...

Signs of a break in the tribal housing scheme in Maliwada | माळीवाड्यातील आदिवासी बांधवांच्या घरकुल योजनेला ब्रेक लागण्याची चिन्हे

माळीवाड्यातील आदिवासी बांधवांच्या घरकुल योजनेला ब्रेक लागण्याची चिन्हे

googlenewsNext

दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत माळीवाडा येथील २७ घरकुले मंजूर करण्यात आली. गट क्र. १८७ मध्ये सोळा हजार पाचशे स्क्वेअर फूट जमीन देण्यात आली. पण सदर घरकुल योजनेसाठी जास्त जमिनीची आवश्यकता होती. जागेची कमतरता असल्याने घरे दुमजली बांधण्यात यावी. अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली.

तीन महिन्यांपूर्वी घरकुल बांधकामाचे भूमिपूजनही झाले. त्यामु‌ळे दोन वर्षांपासून सुरू असलेला घराचा लढा आता संपला. पण नेहमीप्रमाणे पुन्हा घरकुलाच्या बांधकामाला विघ्न आले आहेत. विकास शुल्क दर रक्कम १८,८३९ व जमीन अधिमूल्यन शुल्क रक्कम ३८,४५९ असे ५७,२९८ रुपयाचा भरणा करावा लागणार आहे. त्यामु‌ळे रोजच्या रोजीरोटीसाठी भटकंती कराव्या लागणाऱ्या या आदिवासी बांधवांनी ५७,२९८ रुपयांचा निधी आणायचा कोठून, असा प्रश्न पडला आहे.

Web Title: Signs of a break in the tribal housing scheme in Maliwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.