युती झाल्याने राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:04 PM2019-02-18T23:04:23+5:302019-02-18T23:04:56+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्याचे शिवसेना-भाजपतर्फे सोमवारी जाहीर करण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चिंतेतही वाढ झाली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि युतीचा उमेदवार निश्चित झाला आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीला आता तुल्यबळ उमेदवार शोधावा लागणार आहे. युतीला थेट टक्क र देणारा उमेदवार म्हणून आघाडीकडून कोण मैदानात उतरणार याकडे आता लक्ष लागले आहे.
औरंगाबाद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्याचे शिवसेना-भाजपतर्फे सोमवारी जाहीर करण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चिंतेतही वाढ झाली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि युतीचा उमेदवार निश्चित झाला आहे. काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीला आता तुल्यबळ उमेदवार शोधावा लागणार आहे. युतीला थेट टक्क र देणारा उमेदवार म्हणून आघाडीकडून कोण मैदानात उतरणार याकडे आता लक्ष लागले आहे.
भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनात नसतानाही त्यांना आता शिवसेनेच्या उमेदवाराचे लोकसभेसाठी काम करावे लागणार आहे. केंद्रात सत्ता येण्याच्या अनुषंगाने या भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
चार वर्षांपासून शिवसेनेने भाजपच्या प्रत्येक धोरणावर टीका केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बेबनावाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत त्या बेबनावाच्या वातावरणाची खुन्नस काढण्याची संधी यावेळी मिळण्याच्या अपेक्षेत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते होते. परंतु युती झाल्यामुळे भाजप आणि सेना दोघांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शिवसेनेलाही संभाव्य उमेदवाराचे काम करण्याची इच्छा नाही, तर भाजपलाही शिवसेनेच्या त्याच उमेदवाराचे काम करावे लागणार असल्यामुळे अस्वस्थ वाटू लागले आहे. परिवर्तनाच्या अनुषंगाने वर्षभरापासून भाषणबाजी करणाऱ्या भाजप नेत्यांची दातखिळी बसली आहे. तर मनात नसतानाही त्याच उमेदवाराचे काम करावे लागणार असल्याने शिवसेनेतील एका गटाची पाचावर धारण बसली आहे.
आघाडीचं काय चाललंय
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडायची की काँग्रेसने लढवायची याचा निर्णय अजून झालेला नाही. या सगळ्या चर्चेत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर करण्यात बाजी मारली आहे. मनसे, शिवस्वराज्य बहुजन पक्षाने अजून तरी काही निर्णय जाहीर केलेला नाही. सध्या तरी तिरंगी लढतीचे चित्र असेल, अशी शक्यता आहे. २० फेबु्रवारीनंतर काय राजकीय घडामोडी होतात, त्यावर सर्व काही अवलंबून आहे. अनेकांच्या मनसुब्यावर पाणी
लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही युती झाल्याने औरंगाबाद जिल्ह्यात दोन्ही पक्ष़ांतील खरी नाराजी उमटली आहे ती विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची जागा युतीच्या कोट्यात शिवसेनेकडे आहे. यामुळे शिवसेनेच्या विद्यमान आमदार संजय शिरसाट यांना युतीमुळे दिलासा मिळाला आहे. भाजपतर्फे मोर्चेबांधणी करणाºया अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर मात्र पाणी फिरले आहे. याचबरोबर औरंगाबाद मध्य मतदारसंघ सध्या एमआयएमकडे आहे. युतीमध्ये हा मतदारसंघही शिवसेनेकडे आहे. यामुळे याठिकाणी गेल्या पाच वर्षांपासून युती होणार नाही, असे गृहित धरुन तयारी करत असलेल्या भाजपच्या किशनचंद तनवाणी यांना मोठा झटका बसला आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही शिवसेनेला भाजपचे काम करावे लागणार आहे. इतर मतदारसंघातील युतीमधील अनेक इच्छुकांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी नाराजी पसरण्याची चिन्हे आहेत.