तुळजापुरात मूक पदयात्रा

By Admin | Published: March 27, 2017 11:50 PM2017-03-27T23:50:00+5:302017-03-27T23:52:18+5:30

तुळजापूर : धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून तुळजापुरातून मुक पदयात्रा काढण्यात आली.

Silent hiking in Tuljapur | तुळजापुरात मूक पदयात्रा

तुळजापुरात मूक पदयात्रा

googlenewsNext

तुळजापूर : धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून तुळजापुरातून मुक पदयात्रा काढण्यात आली. यानंतर त्यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहण्यात आली.
शहरातील तरुणांनी महिनाभर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास पाळला होता. या शिवभक्तांनी महिनाभर दिवसातून एकदाच जेवण करून गोडधोड खाणे टाळले. तसेच सण उत्सव साजरे न करणे, नवीन कपडे न घालणे अशा पध्दतीने महिनाभर सुतक पाळले. सोमवारी संभाजी महाराजांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण करून शहरातील भाजी मंडई, भवानी रोड, आर्य चौक, कमानवेस, शिवाजी
चौक ते परत भाजी मंडई या मार्गावरून मुक पदयात्रा काढण्यात आली. यानंतर संभाजी महाराजांचा प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र, श्लोक घेऊन त्यांच्या चितेची प्रतिकृती करून अग्नी देण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा अर्चनाताई गंगणे, नगरसेविका हेमा कदम, सचिन सूर्यवंशी, श्रीकांत कावरे, विपीन शिंदे, केदार शिंदे, बाळासाहेब भोसले, राहूल साखरे, सचिन शिनदे, सुनील शिंदे, बाळू सजन, दयानंद पेंदे, महंत मावजीनाथ बाबा, महंत इच्छागिरी महाराज, रोहन भांजी, संतोष इंगळे, सुहास साळुंके, गुलचंद व्यवहारे आदी उपस्थित होते.

Web Title: Silent hiking in Tuljapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.