Video: सिल्लोडमध्ये कडकडीत बंद; उपसरपंचाने बाईक पेटवून केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 12:54 PM2023-09-04T12:54:59+5:302023-09-04T13:00:00+5:30
आंदोलकांनी तहसीलदार रमेश जसवंत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सिल्लोड: शहरात सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सिल्लोड शहरासहित तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे. सर्व व्यापारी व दुकानदारांनी बाजारपेठ बंद ठेवली. दरम्यान, शहरात एका आंदोलकाने स्वतःची बाईक जाळून जालना लाठीचार्जचा निषेध केला.
सकाळी १० वाजता सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात सर्व समाज बांधव जमा झाले. त्यानंतर जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी सिल्लोड येथील आंबेडकर चौकात गोळेगावचे उपसरपंच अनिल बनकर यांनी स्वतःची बाईक जाळून सरकारचा निषेध केला.
सिल्लोडमध्ये कडकडीत बंद; उपसरपंचाने बाईक पेटवून केला निषेध#MarathaReservationpic.twitter.com/pYn3wdm9sp
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 4, 2023
आंदोलकांनी आंबेडकर चौकातून मोर्चा काढला. भगतसिंग चौक मार्गे नीलम चौकातून तहसिल कार्यालयात मोर्चा धडकला. तहसीलदार रमेश जसवंत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.