राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजीत आकाशला रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:14 AM2017-12-31T00:14:41+5:302017-12-31T00:15:15+5:30
सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आकाश कल्याणकर याने रौप्यपदकाची कमाई केली. दुर्गेश जहागीरदार आणि तुषार आहेर हे कास्यपदकाचे मानकरी ठरले.
औरंगाबाद : सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आकाश कल्याणकर याने रौप्यपदकाची कमाई केली. दुर्गेश जहागीरदार आणि तुषार आहेर हे कास्यपदकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तिसरा क्रमांक मिळवला.
आकाश कल्याणकर याने इप्पी प्रकारात रौप्यपदक पटकावले, तर तुषार आहेर व दुर्गेश जहागीरदार यांनी फॉईल प्रकारात कास्यपदकाची कमाई केली.
राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाºया आकाश कल्याणकर याने थायलंड ओपन फेन्सिंग चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सहभाग नोंदवला. त्याने आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवर २ पदके जिंकली आहेत, तर राज्यपातळीवर १९ पदकांची लूट केली आहे.
तसेच कास्यपदक जिंकणाºया तुषार आहेर याने याच वर्षी तैवान येथे जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. तसेच थायलंड ओपन फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्येही त्याने आपला ठसा उमटवला आहे. त्याने राष्ट्रीय स्पर्धेत ५, आंतरविद्यापीठ स्पर्धेत ४ आणि राज्यस्तरीय स्पर्धेत ४० पदकांची लूट केली आहे.
सोलापूर येथे कास्यपदक जिंकणाºया दुर्गेश जहागीरदार याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना आशियाई, जागतिक कॅडेट तलवारबाजी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. तसेच बँकॉक येथील थायलंड ओपन चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्यपदक जिंकले आहे. त्याने राष्ट्रीय पातळीवर ८ आणि राज्यपातळीवर ३३ पदकांची कमाई केली आहे. या खेळाडूंना तुकाराम मेहेत्रे, दिनेश वंजारे, स्वप्नील तांगडे, सागर मगरे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. या यशाबद्दल क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, चंद्रशेखर घुगे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे, तलवारबाजीचे एनआयएस प्रशिक्षक संजय भूमकर, छाया पानसे, शंकर पतंगे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.