सिंदफणा मध्यम प्रकल्प अद्याप कोरडा

By Admin | Published: September 13, 2014 10:58 PM2014-09-13T22:58:04+5:302014-09-13T23:13:22+5:30

शिरूरकासार : गेल्या पंधरा- वीस दिवसात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ओढ्या- नद्यांना पाणी आले तर पाझर तलाव भरले. मात्र शिरूरकरांची तहाण भागविणारा

Sindhana medium project still dry | सिंदफणा मध्यम प्रकल्प अद्याप कोरडा

सिंदफणा मध्यम प्रकल्प अद्याप कोरडा

googlenewsNext


शिरूरकासार : गेल्या पंधरा- वीस दिवसात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ओढ्या- नद्यांना पाणी आले तर पाझर तलाव भरले. मात्र शिरूरकरांची तहाण भागविणारा मोठ्या पोटाचा सिंदफणा मध्यम प्रकल्प अजूनही कोरडाच आहे.
गणपतीच्या आगमनानंतर पावसाने जोर धरला होता. केवळ याच काळात तालुका परिसरात जोरदार वृष्टी झाली. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले. जागोजागी पाणी साचल्याचे पाहून अनेकांना समाधान मिळाले होते. नद्या - ओढ्यांना पाणी आले होते. या पावसामुळे शिरूरकरांची तहान भागविणारा सिंदफणा प्रकल्प भरेल, अशी अपेक्षा अनेकांची होती. मात्र ही अपेक्षा साफ फोल ठरली आहे. मध्यम प्रकल्प अद्यापही कोरडाच आहे. सरासरी इतका पाऊस झाला नसला तरी जेमतेम आलेल्या पावसाने टँकर बंद झाले. तालुक्यात जवळपास १२५ शेततळे डबडबले असून ओढे- नाले डोंगरदऱ्यातून पाणी खळखळत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरूर शहराचे वैभव असणारी सिंदफणा नदी एक दिवसाचा महापूर घेऊन आली आणि निघून गेली. आज प्रवाह थांबला असला तरी सिद्धेश्वर बंधारा पूर्णपणे भरला आहे. त्याच बरोबर आनंदगाव, लोणी, मोरजळवाडी, पौंडुळ असे छोटे तलाव भरण्याच्या मार्गावर आहे. तहसील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निमगाव ६० टक्के, हिवरसिंगा ३० टक्के, नारायणगड ७० टक्के, बेलपारा १५ टक्के तर शिरूरला पाणीपुरवठा करणारा उथळा प्रकल्प ६५ टक्के भरला आहे. घाटशिळ प्रकल्पात देखील ४५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र सिंदफणा मध्यम प्रकल्पात अद्याप मोजपट्टी लावता येत नाही. तिंतरवणी सर्कमध्ये सर्वात अधिक पाऊस झाल्यामुळे पूर्ण पाझर तलाव भरले आहेत. एकटा सिंदफणा प्रकल्प सोडता सर्वत्र समाधानकारक चित्र पहावयास मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी आले आहे. परिणामी पशुधनाच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शिरूर तालुका परिसरात ठिकठिकाणी हिरवेगार चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)

Web Title: Sindhana medium project still dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.