सिंगलचा पट्टा : भाजी मार्केट स्वतंत्र जागेवर बसवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:05 AM2021-01-09T04:05:01+5:302021-01-09T04:05:01+5:30
फुलंब्री : शहरात मुख्य रस्त्याहून शहरात जाणाऱ्या रस्त्यावरच भाजीपालाविक्रेते बसत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात जाणारा ...
फुलंब्री : शहरात मुख्य रस्त्याहून शहरात जाणाऱ्या रस्त्यावरच भाजीपालाविक्रेते बसत असल्याने
वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात जाणारा एकच प्रमुख मार्ग आहे. त्यात भाजीपाल्याची दुकाने थाटली जातात, यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक ठप्प होते. या भाजीपाला विक्रेत्यांकरिता स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी,जेणेकरुन वाहतुक सुरळीत होईल व नागरिकांना त्रास होणार नाही. अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.
---------------------------------------------------------------------------------------
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
फुलंब्री : शहर ते पानवाडी रस्त्यावरील फूलमस्ता नदीवर असलेल्या नळकांडी पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात पूर येऊन या पुलावरुन पाणी वाहत असल्याने काही काळासाठी वाहतूकमार्ग बंद पडतो. यामुळे पानवाडी गावाचे नागरिक व या शेतात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे सदर पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी जोर धरीत आहे.
------------------------------------------------------------------------------
संरक्षक भिंत बांधण्याची गरज
फुलंब्री : येथील पंचायत समितीच्या इमारती सभोवताली गवताचे तसेच कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. इमारतीच्या दोन्ही बाजूंनी भिंत नसल्याने व रस्ता खुला असल्याने येथे रात्रीच्या वेळी कोणीही ये-जा करतात. तसेच तळीराम येथे दारू पितात तर काही महाभाग शौच करीत असल्याने दुर्गंंधी पसरत आहे. त्यामुळे येथे संरक्षक भिंत बांधण्याची मागणी होत आहे.