सिंंगल बातम्या : फुलंब्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:04 AM2021-01-10T04:04:46+5:302021-01-10T04:04:46+5:30
फुलंब्री : येथील सरकारी कार्यालयांतील पायऱ्या व कोपरे हे पिचकाऱ्यांनी रंगलेले असून अस्वच्छता पसरली आहे. तालुकाभरातून तहसील तसेच पंचायत ...
फुलंब्री : येथील सरकारी कार्यालयांतील पायऱ्या व कोपरे हे पिचकाऱ्यांनी रंगलेले असून अस्वच्छता पसरली आहे. तालुकाभरातून तहसील तसेच पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक तंबाखू, गुटखा खाऊन थुंकत असल्याने सरकारी कार्यालयांची अशी अवस्था झाली आहे. दोन्ही बाजूंनी कार्यालये या पिचकाऱ्यांनी रंगलेली दिसत असल्याने अशा थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.
....................................................................................
अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल
फुलंब्री : शहरात जाणाऱ्या रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीची नेहमी कोंडी होते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांनी केली आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गापासून फुलंब्री शहरात जाण्याकरिता हा एकमेव रस्ता असून त्यावर अतिक्रमण झाल्याने तो अरुंद झाला आहे. परिणामी ये-जा करणाऱ्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची मागणी होत आहे.