वहिनी, पुतण्याचा खून करणारा कीर्तनकार जेरबंद
By Admin | Published: June 19, 2017 12:33 AM2017-06-19T00:33:57+5:302017-06-19T00:39:44+5:30
शिऊर : शेतीच्या वादातून वहिनी व पुतण्याचा धारदार कोयत्याने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील जिरी येथे ६ जून रोजी घडली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
शिऊर : शेतीच्या वादातून वहिनी व पुतण्याचा धारदार कोयत्याने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील जिरी येथे ६ जून रोजी घडली होती. यातील फरार असलेला कीर्तनकार आरोपी राजेंद्र सूर्यवंशी याला जेरबंद करण्यात अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले.
बारा दिवसानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या औरंगाबाद पथकाने पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून त्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक उज्वला वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विवेक जाधव , सपोनि. धनंजय फराटे, सहायक फौजदार गफार पठाण, रोहिदास तांदळे, जमादार विक्रम देशमुख,
गणेश मुळे यांच्या पथकाने केली. गेल्या १२ दिवसांपासून पोलीस विविध ठिकाणी पथके पाठवून त्याचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी राजेंद्र सूर्यवंशी याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांनी दिली.