नदी पात्राजवळ खेळत असणा-या भावंडांचा डोहात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 02:57 PM2017-09-11T14:57:22+5:302017-09-11T14:59:16+5:30
नदी पात्राजवळ खेळत असताना पाय घसरून डोहात पडलेल्या सख्या भावंडाचा नगीना पींपळगाव येथे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी दुपारपासूनच सिद्धेश(८ ) व सुरेश ( ५) हि भावंडे बेपत्ता होती. आज सकाळी मुलांच्या घराजवळील नदीपात्रात त्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आली.
वैजापुर ( औरंगाबाद ) : नदी पात्राजवळ खेळत असताना पाय घसरून डोहात पडलेल्या सख्या भावंडाचा नगीना पींपळगाव येथे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी दुपारपासूनच सिद्धेश(८ ) व सुरेश ( ५) हि भावंडे बेपत्ता होती. आज सकाळी मुलांच्या घराजवळील नदीपात्रात त्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजस्थान येथील रगू भरवाड हे कुटुंबासह गेल्या दोन वर्षापासून गायी संगोपनासाठी येथे राहतात. रविवारी दुपारीपासून त्यांची दोन्ही मुले बेपत्ता होती. संपूर्ण गावाने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु , त्यांचा शोध लागला नव्हता. यातच आज सकाळी त्यांची मृतदेह भरवाड यांच्या घराजवळील नदीपात्रात तरंगताना आढळून आली. पोलिसांच्या अंदाजानुसार सिद्देश व सुरेश हि भावंडे घराच्या शेजारी असलेल्या नदीकाठी ओढ्याच्या कडेला खेळत असताना पाय घसरून डोहात पडली. डोहात खोलवर गाळ असल्याने दोघेही गाळात फसली. त्यात बुडत असताना त्यांना वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांच्यावर मृत्यू ओढवला.
सकाळी मृतदेह नदीपात्रात तरंगत असल्याची माहिती मिळताच गावक-यांनी घटनास्थळी जमून त्यांना पाण्यातून बाहेर काढले. याप्रकरणी वैजापुर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार एस.के.धादवड करीत आहेत.या हृद्यविदारक घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.