शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:03 AM2021-03-06T04:03:26+5:302021-03-06T04:03:26+5:30
औरंगाबाद : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीकडून येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन ...
औरंगाबाद : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीकडून येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने शेतीसंदर्भात केलेले तीनही कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात असून, ते रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या कायद्यांमध्ये हमीभावाची तरतूद नाही तर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याची तरतूद आहे. हे सर्व शेतकरीविरोधी आहे, असे या आंदोलकांचे मत होते.
सकाळी अकरा वाजल्यापासून या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष लता बामणे, वंचित बहुजन आघाडी पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, शहर महिलाध्यक्ष वंदना नरवडे, डॉ. जमील देशमुख, संदीप शिरसाट, पंडितराव तुपे, मेघानंद जाधव, महेश निनाळे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.