सहा महिन्यांत ६१ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या ५४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:02 AM2021-07-29T04:02:11+5:302021-07-29T04:02:11+5:30

राम शिनगारे औरंगाबाद : अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०२० या वर्षात एकूण ९५ मुलींनी ...

In six months, 61 minor girls fled; Police found 54 | सहा महिन्यांत ६१ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या ५४

सहा महिन्यांत ६१ अल्पवयीन मुली पळून गेल्या; पोलिसांना सापडल्या ५४

googlenewsNext

राम शिनगारे

औरंगाबाद : अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०२० या वर्षात एकूण ९५ मुलींनी पलायन केल्याच्या घटना घडल्या होत्या. चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यांत तब्बल ६१ मुली पळून गेल्या असल्याची आकडेवारी समोर आली आहे. या पळून गेेलेल्या मुलींपैकी तब्बल ५४ जणींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती सहायक पोलीय आयुक्त रवींद्र साळोखे यांनी दिली.

अल्पवयात भावनिकदृष्ट्या घरातून सहानुभूती किंवा पाठबळ न मिळाल्यास समज नसलेल्या मुली भरकटतात. त्या मुलींना बाहेरून कोणीतरी पाठिंबा देतात. तेव्हा त्या बंड करण्यास तयार होतात. या बंडाच्या माध्यमातूनच पळून जाण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्यात येत असल्याची कारणे समोर आली आहेत. याशिवाय आई-वडिलांमध्ये असलेला बेबनाव, घरात लक्ष देण्याकडे दुर्लक्ष, मुलांना लागलेली चुकीची संगत आणि घरात विचार व्यक्त करण्याच्या नसलेल्या स्वातंत्र्यामुळे अनेक मुलींमध्ये बंडखोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या १२ महिन्यांच्या कालखंडात ९५ मुली पळून गेल्याची आकडेवारी आहे. यापैकी ९२ मुलींना परत पालकांकडे आणण्यात पोलिसांना यश मिळालेले आहे. या वर्षात केवळ तीन मुलींचा शोध घेता आलेला नाही. त्याचवेळी १ जानेवारी २०२१ ते ३० जून २०२१ या सहा महिन्यांच्या कालखंडात ६१ मुली पळून गेल्या आहेत. त्यापैकी ५४ मुलींना शोधण्यात यश प्राप्त झाले. अद्याप ७ मुलींचा शोध सुरू असल्याचे पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आकडेवारी

अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना

२०२० : ९५

२०२१ : ६१ (१ जानेवारी ते ३० जून)

उदाहरण १

वास्तव समजल्यास भान येते

शहरातील एक अल्पवयीन आई-वडिलांचा कोणताही विचार न करता प्रेमात आंधळी होऊन पळून जाते. पळून गेल्यानंतर होणाऱ्या छळानंतर तिला मुलासोबत राहवे वाटत नाही. जेव्हा पोलीस पकडून आईवडिलांच्या हवाली करतात, तेव्हा आपण केलेली चूक समजते. तत्काळ मुलाला सोडून आई-वडिलांसोबत राहण्यास होकार देते.

उदाहरण २

स्टंट प्रत्यक्षात कामी येत नाहीत

एक मुलगी स्टंट करण्याऱ्या मुलासोबत पळून जाते. मुलगाही आईवडिलांच्या जिवावर जगत होता. जेव्हा तो एका मुलीला पळवून आणतो. तेव्हा त्याला पैसे असेपर्यंत बरे वाटते. त्यानंतर हाल सुरू होतात. त्याचवेळी पोलीस पकडतात. मुलींना या काळात झालेल्या हालअपेष्टा लक्षात येतात. त्यामुळे स्टंट कामी येत नाहीत, असे म्हणत आई-वडिलांना जवळ करते.

प्रतिक्रिया

मुला-मुलींचे मित्र व्हा

आई-वडिलांनी मुला-मुलींच्या अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे. विशेषत: मुलींच्या भावना, अपेक्षा ऐकून घेत त्यावर मत व्यक्त न करता, त्यातून पर्याय शोधला पाहिजे. मुलींच्या मनाप्रमाणे सहज शक्य असणाऱ्या गोष्टी करू देत त्यांची आवड समजून घेतली पाहिजे. मुलगा-मुलगी अशी तुलना न करता मुलींना घरात मानसन्मान दिला पाहिजे. हे करतानाच मुलींच्या वर्तनावरही आईने लक्ष ठेवले पाहिजे. ती कोणाशी बोलते, कोणत्या मैत्रिणी आहेत. ती काय करते यााकडेही लक्ष असले पाहिजे. अलीकडे लॉकडाऊनच्या परिणामामुळेही पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

- डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ

Web Title: In six months, 61 minor girls fled; Police found 54

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.