सहा महिन्यांत ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:48 PM2017-08-03T23:48:11+5:302017-08-03T23:48:11+5:30
जानेवारी ते जून २०१७ अखेर पोलीस दलातर्फे जिल्हाभरात मोहिम राबवून जुगारप्रकरणी १११ तर अवैध दारूविक्रीचे एकूण ६५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही मिळुन आरोपींकडून कारवाई दरम्यान ४६ लाख ९० हजार १८४ रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा पोलीस दलातर्फे अवैध दारूविक्री तसेच जुगार खेळणाºयांविरूद्ध दरदिवशी मोहीम राबविली जाते. जानेवारी ते जून २०१७ अखेर पोलीस दलातर्फे जिल्हाभरात मोहिम राबवून जुगारप्रकरणी १११ तर अवैध दारूविक्रीचे एकूण ६५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही मिळुन आरोपींकडून कारवाई दरम्यान ४६ लाख ९० हजार १८४ रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात अवैध दारूव्रिक्री तसेच जुगार खेळणाºयांवर पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहिम राबवून कारवाई केली जाते. जिल्हाभरात अवैध धंदेविरूद्ध कारवाई केली जात असली तरी, ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने जुगार, मटका तसेच अवैध दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अवैध-धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक दिवशी मोहिम राबवून अवैध धंदेचालकांविरूद्ध कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण १४ पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी विशेष मोहिम राबवून जुगारप्रकरणी १११ जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून १२ लाख १२ हजार २२२ रूपये मुद्देमाल व जुगारसाहित्य जप्त करण्यात आले. तर अवैध दारूविक्री प्रकरणी मोहिम राबवून ६५५ आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून ३४ लाख ७७ हजार ९६२ रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थागुशाचे पोनि मारोती थोरात यांनी दिली. स्थागुशा, वाहतूक शाखा तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध दारूविक्री करणारे, तसेच दुचाकीवरून वाहतूक करणारे, गावठी दारूचे सडके रसायन पोलीसांनी जप्त केले. जुगार व दारूबंदी कायद्या अंतर्गत आरोपींविरूद्ध विविध पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे दिली. परिसरात जुगारखेळ किंवा अवैध दारूविक्री होत असेल तर पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले.