जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा तिढा सहा महिन्यांपासून सुटेना

By Admin | Published: February 21, 2017 10:21 PM2017-02-21T22:21:29+5:302017-02-21T22:23:04+5:30

बीड : येथील जिल्हा रुग्णालयालगत पोलीस खात्याच्या अखत्यारीत असलेली जागा रुग्णालयाला वाढीव खाटांसाठी देण्यात यावी, अशी मागणी आहे

From the six months of the District Hospital's place, | जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा तिढा सहा महिन्यांपासून सुटेना

जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा तिढा सहा महिन्यांपासून सुटेना

googlenewsNext

बीड : येथील जिल्हा रुग्णालयालगत पोलीस खात्याच्या अखत्यारीत असलेली जागा रुग्णालयाला वाढीव खाटांसाठी देण्यात यावी, अशी मागणी आहे. यासाठी शासनाकडून २० कोटी रुपये मिळालेले आहेत. मात्र जागेचे भिजत घोंगडे असल्याने २० कोटी रुपये ३१ मार्चनंतर परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बीड जिल्हा रुग्णालय येथे २०० खाटांचे नवीन रुग्णालय प्रस्तावित आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांनी प्रयत्न केलेला आहे. मात्र गृहखात्याकडे असलेली जागा रुग्णालयाला मिळत नसल्याने राज्य शासनाकडून मिळालेले २० कोटी रुपये ३१ मार्चनंतर परत जाऊ शकतात. पुन्हा नव्याने हा प्रस्ताव करावा लागेल. यासाठी बराच अवधी जाऊ शकतो. (प्रतिनिधी)

Web Title: From the six months of the District Hospital's place,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.