दहापैकी सहाजणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:02 AM2021-07-09T04:02:56+5:302021-07-09T04:02:56+5:30

राम शिनगारे औरंगाबाद : स्मार्ट फोन आलेले असल्यामुळे इतर व्यक्तींचे तर सोडाच, पण स्वत:च्या बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नसल्याचे ...

Six out of ten do not even have a wife's mobile number | दहापैकी सहाजणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नाही

दहापैकी सहाजणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नाही

googlenewsNext

राम शिनगारे

औरंगाबाद : स्मार्ट फोन आलेले असल्यामुळे इतर व्यक्तींचे तर सोडाच, पण स्वत:च्या बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नसल्याचे रिॲलिटी चेकमध्ये आढळून आले. शहरातील क्रांती चौकात 'ऑन दी स्पॉट' उपस्थितांना पत्नीचा मोबाईल नंबर पाठ आहे? का? नसेल तर कशामुळे? स्वत:चा सोडून कोणता मोबाईल नंबर पाठ आहे? असे प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. दहा जणांपैकी तब्बल सहा जणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नसल्याचे स्पष्ट झाले, तर चार जणांनी पत्नीचा मोबाईल नंबर सांगितला. मात्र, त्यातील दोघांना पत्नीचा एकच मोबाईल नंबर आठवल्याचेही आढळून आले.

चौकट,

गुरू, नेत्याचा पाठ, पण...

एका प्राध्यापक असलेल्या व्यक्तीला पत्नीचा नंबर विचारला असता, त्यांना तो पाठ नसल्याचे आढळून आले. त्याचवेळी त्यांनी त्यांचे गुरू राहिलेल्या प्राध्यापकाचा, नेत्याचा तोंडपाठ नंबर सांगितला. एकाने पत्नीचा मोबाईल नंबर सांगण्यासाठी किंवा फोन करण्यासाठी मोबाईल पाहावा लागतो, असे सांगितले. पत्नीचा मोबाईल नंबर पाठ नाही, असे कधी जाणवलेच नाही. तसेच त्याची अडचणही आली नाही. नेहमीच मोबाईलमध्ये सेव्ह असलेला नंबरच डायल केला जातो, असेही काही जणांनी सांगितले.

बॉक्स

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच

एकूण दहा जणांपैकी सहा जणांना पत्नीचा मोबाईल नंबर आठवला नाही. त्यात दोन तरुण पतींचाही समावेश होता, तर एका वृद्धाचा आणि उर्वरित मध्यम वयाच्या व्यक्ती होत्या. त्यांना पत्नीचा मोबाईल नंबर आठवला नाही. त्यामुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारेच जण नंबरसाठी मोबाईल फोनवर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले.

बॉक्स

बायकांना पतिदेवाचा नंबर मुखपाठ

अनेक पतींना पत्नीचा मोबाईल नंबर पाठ नसल्याचे दिसून आले. मात्र याउलट परिस्थिती महिलांच्या बाबतीत आढळून आली. दोन महिलांशी संपर्क साधला असता, त्यातील कांचनवाडी परिसरातील एका गृहिणी असलेल्या महिलेने पतीचे दोन्ही मोबाईल नंबर तात्काळ सांगितले, तर दुसऱ्या एका प्राध्यापक महिलेनेही पतीचा एक मोबाईल नंबर तोंडपाठ असल्यामुळे सांगितला. दुसरा मोबाईल नंबर नुकताच घेतला असल्यामुळे पाठ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बॉक्स

मुलांना तोंडपाठ

आई-वडिलांसह नातेवाईकांचे मोबाईल नंबर मुलांना तोंडपाठ असल्याचे आढळून आले. प्रणव जाधव या विद्यार्थ्याने आई-वडिलांसह नातेवाईकांचे मोबाईल नंबर तात्काळ सांगितले. याशिवाय आजोबा, मावशीसह इतरांचेही मोबाईल नंबर पाठ असल्याचे सांगितले. श्रवण गरड या विद्यार्थ्यानेही आई, बहिणीसह इतर नातेवाईकांचे नंबर सांगितले. त्यामुळे मुलांना नातेवाईकांचे मोबाईल नंबर तोंडपाठ असल्याचे दिसून आले.

कोट,

वय वाढते तशी मेंदूची क्षमता कमी होते

वय जसे जसे वाढत जाते, तसे मेंदूची क्षमता कमी होत जाते. अकुंचन पावत असते. तणाव वाढत असतो. त्याचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. हा परिणाम सर्वांवरच होत नाही. काही यास अपवादही असू शकतात. मात्र मुलांची परिस्थिती विरुद्ध असते. मुलांची आकलन क्षमता, मेंदूमध्ये साठवण्याची क्षमता अधिक असते. त्याचप्रमाणे मुलांना तणाव कमी असतो. त्यामुळे त्यांना तात्काळ मोबाईल नंबरसह इतर गोष्टी आठवतात.

- रश्मीन आचलिया, मानसोपचारतज्ज्ञ

Web Title: Six out of ten do not even have a wife's mobile number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.