सिल्लोडमध्ये लसीकरणानंतर सोळा लोकांना होते अंगदुखी आणि मळमळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:03 AM2021-01-18T04:03:56+5:302021-01-18T04:03:56+5:30
सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात ७८, तर अजिंठा ग्रामीण रुग्णालयात ५५ अशा एकूण १३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस ...
सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात ७८, तर अजिंठा ग्रामीण रुग्णालयात ५५ अशा एकूण १३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली होती.
अजिंठा ग्रामीण रुग्णालयात लस घेतलेल्या रुग्णांपैकी तीन लोकांना उलटी झाली आहे. तर इतर लोकांचे डोके व लस दिलेले हात दुखत आहेत. तर काहींना मळमळ, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी ताप असा त्रास होत आहे. मात्र यात कोणताही धोका नसल्याचे अजिंठा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बी. डी. खंदारे यांनी सांगितले.
या अकरा जणांना झाला त्रास
अजिंठा ग्रामीण रुग्णालयात लस घेतलेल्या शेख वाजेद अहेमद, संगीता लक्ष्मण जाधव, लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर काळे या तिघांना उलटी झाली होती. तर दैवशाला पायगव्हाण, रवींद्र नागरे, गीता देवराव अपार, वैशाली विलास, पुष्पा भीमराव बोराडे, प्रभाबाई भीमराव बिऱ्हारे, डॉ. सुरेखा तोतला यांना मळमळ, अंगदुखी, डोकेदुखी हा त्रास झाला. सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयातील ज्योती काकडे, सुनीता महापुरे, लता परदेशी, डॉ. मगर, मनीषा वाघ या आरोग्य कर्मचाऱ्यांना थंडी ताप, अंगदुखीचा त्रास झाला.