सलग सहाव्या दिवशी हजारावर रुग्णवाढ; जिल्ह्यात १२५१ कोरोनाबाधितांची भर, ५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 12:45 PM2021-03-20T12:45:24+5:302021-03-20T12:47:42+5:30

corona cases rapidly increases in Aurangabad जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६४,२४३ झाली आहे. आजपर्यंत ५३,४९८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

For the sixth day in a row; Addition of 1251 corona victims in the district, 5 deaths | सलग सहाव्या दिवशी हजारावर रुग्णवाढ; जिल्ह्यात १२५१ कोरोनाबाधितांची भर, ५ मृत्यू

सलग सहाव्या दिवशी हजारावर रुग्णवाढ; जिल्ह्यात १२५१ कोरोनाबाधितांची भर, ५ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देशुक्रवारी दिवसभरात ४५९ रुग्णांना उपचारानंतर सुटी सध्या जिल्ह्यात ९,३५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद ः गेल्या सात दिवसांत जिल्ह्यात तब्बत ८५०१ कोरोनाबाधित आढळून तर ६२ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले. सलग सहाव्या दिवशी हजारावर रुग्णवाढ शुक्रवारी झाली. १२५१ रुग्णांची नव्याने भर पडली. तर ५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात उपचार पूर्ण झाल्याने ४५९ जणांना सुटी देण्यात आली.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६४,२४३ झाली आहे. आजपर्यंत ५३,४९८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत १३८८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ९ हजार ३५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

पाच बाधितांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान बाधित टीव्ही सेंटर येथील ५० वर्षीय महिला, नेमपूर (ता. कन्नड) येथील ४२ वर्षीय पुरुष, खोकडपुरा येथील २५ वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर येथील ६५ वर्षीय महिला तर खासगी रुग्णालयात ५८ वर्षीय बसय्ये नगर येथील पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीत १,०६२
समर्थ नगर ८, पांडुरंग नगर १, बीड बायपास १७, भवानी नगर २, भूषण नगर १, मयूर पार्क ९, एन-४ येथील ६, एन-७ येथील ७, जिल्हा रुग्णालय ३, एन-२ येथील १७, सुरेवाडी ३, प्रकाश नगर २, एन-६ येथील १७, एचडब्लूपीटी १, एचएफडब्लूपीटीसी १, एन-९ येथील ९, जय भवानी नगर १०, काल्डा कॉर्नर १, बन्सीलाल नगर ५, कांचनवाडी ४, ज्योतीनगर ८, पद्मपूरा ६, मिलकॉर्नर १, कैसर कॉलनी १, शिवाजी नगर ७, औरंगाबाद १९, स्नेह नगर १, नक्षत्रवाडी २, उल्का नगरी १०, चेतना नगर ३, गारखेडा परिसर १८, उस्मानपुरा ७, हडको ३, सिडको ५, हर्सूल ४, रायगड नगर १, एन-५ येथील १३, जाधववाडी ३, पन्नालाल नगर ३, मुकुंदवाडी १५, संदेश नगर १, विशाल नगर ८, कैलास नगर २, दर्गा रोड १, शंभुनगर १, पुंडलिक नगर १४, एन-८ येथील ९, शास्त्री नगर १, मोंढा नाका २, एन-११ येथील ४, खोकडपुरा १, हनुमान नगर ४, चिकलठाणा २, ब्रिजवाडी २, जालान नगर ५, राहुल नगर १, अविष्कार कॉलनी १, रामनगर ३, नारळीबाग २, पिसादेवी रोड हर्सूल १, फाजलपुरा २, ईटखेडा ३, बळीराम पाटील शाळा २, छावणी २, पडेगाव ४, एचसीईएस १, नंदनवन कॉलनी १, पीईएस कॉलेज ७, मिलिंद हायस्कूल २, शांतीपुरा १, रोझा बाग १, अंबिका नगर १, राम नगर २, देवळाई २, छत्रपती नगर ३, विठ्ठल नगर ४, न्यू हनुमान मंदिर १, एन-१ येथील २, मातोश्री कॉलनी १, उत्तरा नगरी ५, बालाजी नगर २, विवेक नगर १, विजय नगर २, एन-३ येथील २, भोईवाडा १, आदित्य नगर १, सातारा परिसर ५, विमानतळ १, उद्योग निर्मल कमल १, देवगिरी कॉलनी १, न्यू हनुमान नगर २, टी.व्ही.सेंटर १, स्वांतत्र्य सैनिक कॉलनी २, देवानगरी ६, एमपी लॉ कॉलेज १, नागेश्वरवाडी ३, भावसिंगपुरा २, अनंत भालेराव विद्या मंदिर १, रोकडिया हनुमान कॉलनी १, जाधवमंडी १, आ.कृ.वाघमारे शाळा १, इंदिराबाई पाठक महाविद्यालय ३, समाधान कॉलनी १, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी ३, आयडीबीआय बँक १, सिल्कमिल कॉलनी २, देवगिरी कॉलेज १, तापडिया नगर ५, साकार सृष्टी १, शिवशंकर कॉलनी २, पानदरीबा १, टाऊन सेंटर सिडको १, बायजीपुरा १, न्यायनगर २, मेहेर नगर ५, भानुदास नगर १, मुथियान नगर १, अलोक नगर १, जवाहर कॉलनी ३, म्हाडा कॉलनी १, श्रेय नगर २, भारत नगर १, टिळक नगर १, ज्ञानेश्वर नगर १, गजानन नगर २, नाथ नगर २, विद्या नगर २, बापट नगर १, मोटेश्वर सोसायटी २, राजनगर २, त्रिपाठी पार्क १, नवीन मिसारवाडी १, मिलकॉर्नर १, अजब नगर १, जटवाडा रोड २, औरंगाबाद महानगर पालिका १, वसंत दादा पाटील हायस्कूल १, कृषी अधिकारी कार्यालय १, काबरापुरा १, रेल्वेस्टेशन १, रशीदपुरा १, अलंकार सोसायटी १, संभाजी कॉलनी सिडको १, संकल्प नगर १, होनाजी नगर २, जिजामाता विद्यालय १, पवन नगर २, श्रीकृष्ण नगर ३, मयूर नगर १, नवजीवन कॉलनी १, टी पॉईंट २, शांतिनिकेतन कॉलनी १, व्यंकटेश नगर १, घाटी १, मोतीवाला नगर १, कटकट गेट १, बेगमपुरा १, खाराकुंआ २, कर्णपुरा १, जय विश्वभारती कॉलनी १, रेल्वे स्टेशन १, आकाशवाणी १, प्रताप नगर ४, सूर्यदीप नगर २, शहानूरमियॉ दर्गा ३, नीलकंठ प्लाझा स्टेशन रोड १, शहानूरवाडी ४, रचनाकार कॉलनी २, राजा बाजार १, म्हाडा कॉलनी वेदांत नगर १, शहानगर १, शरद अपार्टमेंट १, दशमेश नगर १, म्हाडा कॉलनी १, गोळेगावकर कॉलनी १, गरम पाणी १, समाधान कॉलनी १, मामा चौक १, राजीव गांधी नगर १, सिंहगड कॉलनी २, अन्य ५३९

ग्रामीणमध्ये १८९ रुग्ण
औरंगाबाद तालुक्यात ४१, वैजापूर ३३, पैठण ४३, गंगापूर ३०, कन्नड २०, खुलताबाद ९, फुलंब्री ९, सिल्लोड ३, सोयगांव १ बाधित रुग्ण आढळून आले.

औरंगाबाद तालुक्यात ७२३ सक्रिय रुग्ण
ग्रामीण भागात सक्रिय रुग्णसंख्या १९५४ झाली असून औरंगाबाद तालुक्यातील सर्वाधिक ७२३ सक्रिय रुग्ण असून त्यापाठोपाठ गंगापूर तालुक्यात ३४१, वैजापूरमध्ये २९१, कन्नडमध्ये २१२, पैठणमध्ये १५९, सिल्लोड ७७, खुलताबाद ६५, फुलंब्रीत ६३, सोयगांव २३ बाधित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

७०३ रुग्ण ग्रामीण कोविड सेंटरमध्ये भरती
ग्रामीणमध्ये १४ कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध ११२९ खाटांपैकी ७०३ रुग्ण भरती आहे. त्यापैकी ४४५ पुरुष तर २५८ महिला असून दिवसभरात लक्षणे नसलेले ११३ रुग्ण शुक्रवारी भरती झाले तर १ लक्षणे असलेला बाधित रुग्ण असून १० जणांना संदर्भीत तर ५१ जण घरी विलगीकरणात राहिले. दिवसभरात ४८ रुग्णांना सुटी देण्यात आली.

डबलिंग रेट ५३.९१ टक्के
ग्रामीणमधील रुग्ण वाढण्याचा सात दिवसांचा डबलिंग रेट ५३.९१ टक्क्यांवर आला आहे. अशी परिस्थिती ग्रामीण भागात यापूर्वी सप्टेंबर महिन्यात होती. तर रुग्ण बाधित आढळून येण्याचा दर १२.९२ टक्के झाला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ८७.६८ टक्क्यांवर घसरला आहे.

गेल्या सात दिवसांतील कोरोनाचा उद्रेक
दिनांक - बाधित -मृत्यू
१९ मार्च - १२५१ -५
१८ मार्च- १५५७ - १५
१७ मार्च- १३३५ - १७
१६ मार्च- १२७१ - ७
१५ मार्च- १३४४ - ५
१४ मार्च- १०२३ - ५
१३ मार्च -७२० - ८
बाधित रुग्ण ८५०१ - बाधित मृत्यू ६२

Web Title: For the sixth day in a row; Addition of 1251 corona victims in the district, 5 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.