सावकारांच्या कर्जाला कंटाळून साठ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:05 AM2020-12-24T04:05:06+5:302020-12-24T04:05:06+5:30
पाचोड : कर्जबाजारी व व्याजाला कंटाळून विहामांडवा शिवारातील शेतात साठ वर्षीय शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. बाळासाहेब विठ्ठलराव आवारे असे ...
पाचोड : कर्जबाजारी व व्याजाला कंटाळून विहामांडवा शिवारातील शेतात साठ वर्षीय शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. बाळासाहेब विठ्ठलराव आवारे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी नातेवाईकांच्या शेतात जाऊन बुधवारी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याने एकच खळबळ उडाली.
विहामांडवा येथील रामभाऊ बाळासाहेब आवारे यांनी पाचोड पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब विठ्ठलराव आवारे हे शेतकरी असून शेतीव्यवसाय करतात. बुधवारी सकाळी ते आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले होते. पण ते दुपारपर्यंत घरी आले नसल्याने रामभाऊ आवारे भावाला सोबत घेऊन वडिलांना शोधण्यासाठी शेतात गेले, पण त्याठिकाणी ते दिसले नाहीत. शोधाशोध केली असता त्यांचे नातेवाईक प्रकाश काकडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला बाळासाहेब आवारे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती रामभाऊ आवारे यांनी पाचोड पोलीस स्टेशनला दिली. यावेळी सपोनि अतुल येरमे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मदने, पोलीस जमादार आप्पासाहेब माळी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बाबासाहेब आवारे यांच्या खिशात चिट्ठी सापडली आहे. त्यात मी सावकाराच्या कर्जाला, त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. पण आवारे यांनी कुणाकडून कर्ज घेतले होते, त्यांनी कुणामुळे आत्महत्या केली असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. रामभाऊ आवारे यांच्या माहितीनुसार, पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.