स्टील बॉडीची ‘एसटी’ घेतेय आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:18 AM2017-08-14T00:18:04+5:302017-08-14T00:18:04+5:30

एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत स्टील बॉडी (माइल्ड स्टील) परिवर्तन बसगाड्यांच्या बांधणीला सुरुवात झाली आहे

 Size of steel body taking 'ST' | स्टील बॉडीची ‘एसटी’ घेतेय आकार

स्टील बॉडीची ‘एसटी’ घेतेय आकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत स्टील बॉडी (माइल्ड स्टील) परिवर्तन बसगाड्यांच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने अ‍ॅल्युमिनियमऐवजी स्टील बॉडीमध्ये बांधण्यात येणारी ही एसटी हळूहळू आकार घेत आहे.
एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत गेल्या अनेक वर्षांपासून अ‍ॅल्युमिनियम बांधणीतील बसची निर्मिती करण्यात येते. या बसगाड्यांनी ‘एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास’ ही ओळख निर्माण केली. आता महामंडळ त्यापुढे पाऊल टाकत स्टील बॉडीच्या बसची निर्मिती करीत आहे.
रस्त्यावरील प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी स्टील बॉडीच्या परिवर्तन बस (लाल बस) बांधणीचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यानुसार चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत प्रायोगिक तत्त्वावर अशा पाच बस बांधण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या बस बांधणीला सुरुवात झाली आहे.
चेसिसवर बसचा लोखंडी सांगाडा तयार झाला आहे. अ‍ॅल्युमिनियमच्या बसमध्ये हा सांगाडा तयार करण्यासाठी अ‍ॅल्युमिनियमच्या पाइपबरोबर नट-बोल्टचा वापर केला जातो; परंतु स्टील बॉडीमध्ये नट-बोल्टांची जागा वेल्डिंगने घेतली आहे. सध्याच्या अ‍ॅल्युमिनियम बसपेक्षा स्टील बॉडी बस अधिक मजबूत राहणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे या बसची उंचीही अधिक राहणार आहे. त्यामध्ये प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा राहणार आहेत.
या बस बांधणीचे काही कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियमित कामकाज सांभाळून या बसची बांधणी केली जात आहे. या बसमध्ये चालकाजवळ माइक व स्पीकर, डिजिटल मार्ग फलक, आपत्कालीन अलार्म, मोठ्या आकाराच्या खिडक्या यासह विविध सुविधा राहणार आहेत. बसची बांधणी सुरू असून आवश्यक असलेले साहित्य दिल्ली, कोलकाता अशा विविध ठिकाणांहून आणले जात आहे, अशी माहिती कार्यशाळा व्यवस्थापक यू. ए. काटे यांनी दिली.

Web Title:  Size of steel body taking 'ST'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.