वासराचा फडशा पाडून बिबट्याची पुन्हा ‘सलामी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:33 AM2018-07-05T00:33:02+5:302018-07-05T00:33:34+5:30

वन विभागानेही टेकले हात : महिनाभरानंतर वडवाळी परिसरात आगमन

 Slaughtering of the calf, the salute again | वासराचा फडशा पाडून बिबट्याची पुन्हा ‘सलामी’

वासराचा फडशा पाडून बिबट्याची पुन्हा ‘सलामी’

googlenewsNext

पैठण : वन विभाग व नागपूर येथून बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या विशेष पथकालाही हात टेकवण्यास भाग पाडणाऱ्या बिबट्याने महिनाभराच्या कालावधीनंतर पुन्हा वडवाळी परिसरात वासराचा फडशा पाडून आगमनाची वर्दी दिली आहे. बिबट्याच्या या जबरदस्त ‘सलामी’ने परिसरात पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभाग सतर्क झाला आहे. गेवराई तालुक्यातून या बिबट्याचे आगमन झाले असावे, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला असून वन विभाग आता या बिबट्याच्या मागावर आहे. आपली जनावरे सुरक्षित जागेवर बांधावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पैठण तालुक्यातील आपेगाव, ज्ञानेश्वरवाडी, आखतवाडा, वडवाळी शिवारात महिनाभरापूर्वी धुमाकूळ घालत बिबट्याने शेतकºयांच्या चार जनावरांचा फडशा पाडला होता. वन विभागाने जंगजंग पछाडूनही हा बिबट्या हातात आला नव्हता. शेवटी हा बिबट्या या परिसरातून निघून गेल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला होता. मात्र महिनाभरापूर्वी गायब झालेला बिबट्या मंगळवारी पुन्हा अवतरल्याने ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडवाळी येथील शेतकरी बापू साळुंके यांच्या उसात दीड वर्षे वयाच्या वासराचा मंगळवारी रात्री या बिबट्याने फडशा पाडला. सकाळी बापू साळुंके यांना शेतात वासराचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी तात्काळ ही खबर वन विभागाच्या अधिकाºयांना दिली.
घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी गोविंद वैद्य, सुधीर धवन, गंगाधर पंडित यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वासराला ठार मारण्याची, मांस खाण्याची पध्दत यावरुन वासराची शिकार बिबट्यानेच केली आहे, असे वन अधिकाºयांनी गावकºयांना सांगितले.
महिनाभरापूर्वी या भागात बिबट्याने दहशत माजवली होती. तब्बल दहा ते पंधरा दिवस या परिसरात बिबट्याने मुक्काम ठोकून चार जनावरांचा फडशा पाडला होता.
वन विभागाकडून शेतकºयांना नुकसानभरपाई
परिसरातील शेतकरी श्रीराम बनकर, रावसाहेब भुजबळ, तुकाराम खरात व आशा खेडकर या चार शेतकºयांच्या वासराची बिबट्याने शिकार केली होती. झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्त शेतकरी श्रीराम बनकर यांना ६००० रुपये, रावसाहेब भुजबळ यांना ६००० रुपये, तुकाराम खरात यांना ३७५०रुपये, आशा खेडकर यांना १५,००० रुपये या प्रमाणे वन विभागाकडून नुकसानभरपाई देण्यात आली असून सदरची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याचे एस. बी. तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी औरंगाबाद यांनी सांगितले.

Web Title:  Slaughtering of the calf, the salute again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.