सिल्लोडमधील कत्तलखान्यांना इतके दिवस अभय कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:02 AM2017-12-26T00:02:27+5:302017-12-26T00:10:03+5:30

सिल्लोडमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तीन कत्तलखान्यांवर दोन दिवसापूर्वी पोलिसांनी धाड मारून सुमारे ५० टन मांस जप्त के ले आणि ११५ जनावरांची मुक्तता केली.

 Slayed slaughter houses in the house for whom? | सिल्लोडमधील कत्तलखान्यांना इतके दिवस अभय कोणाचे?

सिल्लोडमधील कत्तलखान्यांना इतके दिवस अभय कोणाचे?

googlenewsNext

बापू सोळुंके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिल्लोडमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तीन कत्तलखान्यांवर दोन दिवसापूर्वी पोलिसांनी धाड मारून सुमारे ५० टन मांस जप्त के ले आणि ११५ जनावरांची मुक्तता केली. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असली तरी या कत्तलखान्यांची खबर सिल्लोड पोलिसांना नव्हती का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अवैध धंद्याबाबत पोलिसांची एवढी डोळेझाक कोणाच्या इशाºयावरून सुरू होती आणि काल झालेली कारवाई कोणाच्या दबावाखाली करण्यात आली, यावरून आता राजकीय तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
कोणताही अवैध व्यवसाय चार दिवसांपेक्षा अधिक काळ पोलिसांपासून लपून राहू शकत नाही, असे म्हटल्या जाते. यामुळे अवैध धंदे करणारे प्रथम पोलिसांसोबत अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करतात. नंतरच ते त्यांच्या व्यवसायाचा श्रीगणेशा करतात, असे म्हटले जाते. जर हे सत्य असेल तर मग सिल्लोड पोलिसांना या कत्तलखान्यांची माहिती होती, असे म्हणावे लागेल. सिल्लोड येथील तीन कत्तलखान्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी चार कर्मचाºयांसह धाड मारली तेव्हा तेथे सुमारे तीनशेहून अधिक जनावरांची कत्तल केलेली आढळली आणि कत्तलीसाठी आणण्यात आलेली अन्य ११५ जनावरे मिळाली. कत्तलखान्यांत एवढ्या मोठ्या संख्येने आणण्यात येणाºया जनावरांची ने-आण करण्यासाठी ट्रक, टेम्पोचा वापर होतो. एवढेच नव्हे तर जनावरांचे मांस विक्री आॅर्डरप्रमाणे मोठ्या वाहनांतूनच केली जाते. ही वाहतूक नियमितपणे अनेक वर्षांपासून सुरू होती, असे म्हटले जाते. तर मग ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखा, सिल्लोड शहर आणि ग्रामीण पोलिसांना एवढ्या दिवसात मांस आणि जनावरांची वाहतूक करणाºयांवर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्य गुप्तवार्ता विभागासोबत ग्रामीण पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकारी, कर्मचाºयांना याविषयी माहिती मिळाली नसेल तर चिंताजनक आहे. चोरीची जनावरे कत्तलीसाठी वापरल्या जात होती, असे सूत्रांनी सांगितले.

अवैध धंद्यांनी गाठला कळस
३ ते ४ जनावरे घेऊन जाणा-या वाहनाचा पाठलाग करीत असताना कत्तलखाने मिळाल्याचे पोलिसांचे सांगणे, म्हणजे अवैध धंद्याकडे डोळेझाक करण्याचा बाबतीत पोलिसांनी गाठलेला कळसच आहे.
राजकीय कारवाई...
सूत्रांनी सांगितले की, हैदराबादेतील आमदार राजासिंह ठाकूर यांच्या सभेच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आली होती. राजकीय श्रेय लाटण्याच्या उद्देशाने सभेवरून वाद निर्माण केला गेला.
या सभेच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी कत्तलखान्यांवर धाड मारण्यात आल्याने ही मोठ्या नेत्याच्या इशाºयाने कारवाई झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Web Title:  Slayed slaughter houses in the house for whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.