दरवाजात झोपलेला प्रवासी धावत्या रेल्वेतून पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:11 PM2018-09-27T23:11:11+5:302018-09-27T23:12:55+5:30
मोबाईलवरून गाणे ऐकत झोपी गेलेला २१ वर्षीय युवक बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेस या धावत्या रेल्वेतून खाली पडल्याची घटना घडली. रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच तो स्वत: ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अविनाश उत्तम पारगणे (२१, रा. नेवरी, जि.नांदेड) असे या किरकोळ जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
औरंगाबाद : मोबाईलवरून गाणे ऐकत झोपी गेलेला २१ वर्षीय युवक बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेस या धावत्या रेल्वेतून खाली पडल्याची घटना घडली. रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच तो स्वत: ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अविनाश उत्तम पारगणे (२१, रा. नेवरी, जि.नांदेड) असे या किरकोळ जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
नागपूर-मुंबई नंदीग्राम (११४०२) एक्स्प्रेसच्या एस-९ डब्याच्या दरवाजात बसून अविनाश पारगणे हा प्रवास करीत होता. औरंगाबाद स्थानकावर ९ वाजून ५० मिनिटांनी हे रेल्वे दाखल झाली. रेल्वेने ९ वाजून ५५ मिनिटांनी औरंगाबाद स्थानक सोडले. अविनाश मोबाईलवर गाणे ऐकत दरवाजात बसलेला असतानाच झोपी गेला. स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे गेल्यानंतर झोपेत अविनाशचा तोल गेला व तो खाली पडला. सुदैवाने हा अपघात त्याच्या जिवावर बेतला नाही. रेल्वे सेना अध्यक्ष संतोष सोमाणी यांना ही माहिती कळाली. त्यांनी रेल्वे व लोहमार्ग पोलिसांना कळविले. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल तात्काळ घटनेच्या दिशेने गेले. पण किरकोळ जखमी झालेला अविनाश रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. यात लोहमार्ग पोलीस निरीक्षक दिलीप साबळे, सहायक निरीक्षक सागर गोडे, रेल्वे सुरक्षा बलचे निरीक्षक अरविंद शर्मा, कसबे, दिलीप कांबळे, कॉन्स्टेबल खान, सय्यद जफर आदींनी प्रयत्न केले.
.............................
रेल्वे डब्याच्या दरवाजात बसून प्रवास न करण्याचे वारंवार आवाहन प्रवाशांना केले जाते. तरीही प्रवासी दरवाजात बसूनच प्रवास करतात. म्हणूनच लोहमार्ग पोलिसांकडून सोमवारपासून दरवाजात बसून प्रवास करणाºयांविरुद्ध मोहीम राबविली जाणार आहे.
- दिलीप साबळे, निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे, औरंगाबाद.