सोयाबीन, सरकी, पामतेलाच्या भावात किंचित घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:05 AM2021-01-18T04:05:16+5:302021-01-18T04:05:16+5:30

औरंगाबाद : मागील आठवड्यात खाद्यतेलात सोयाबीन, सरकी व पामतेलाचे भाव किंचित कमी झाले, तर बाजारात भाज्यांची मोठी आवक ...

Slight decline in prices of soybean, sorghum and palm oil | सोयाबीन, सरकी, पामतेलाच्या भावात किंचित घट

सोयाबीन, सरकी, पामतेलाच्या भावात किंचित घट

googlenewsNext

औरंगाबाद : मागील आठवड्यात खाद्यतेलात सोयाबीन, सरकी व पामतेलाचे भाव किंचित कमी झाले, तर बाजारात भाज्यांची मोठी आवक झाली, यामुळे टोमाटो, वाटणे,कोथिंबीर भावात आणखी घट झाली.

खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले असताना आठवड्याच्या शेवटी ग्राहकांसाठी थोडी दिलासादायक बातमी आली. पॅकिंगमधील खाद्यतेलाचे भाव कंपन्यांनी कमी केले. यात सोयाबीन तेल लिटरमागे ४ रुपयांनी कमी होऊन १२० ते १२४ रुपये, सरकी तेल ४ रुपयांनी घटून १२० रुपये, तर पामतेल २ रुपयांनी कमी होऊन १२० रुपये प्रति लिटर विक्री होत आहे. केंद्र सरकारने आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केल्याची बातमी खाद्यउद्योगात पसरली होती. पोषक वातावरणामुळे दररोज १५० टन पेक्षा जास्त भाजीपाल्याची प्रचंड आवक बाजारात होत आहे. रस्तोरस्ती विक्रेत्या भाज्याच भाज्या दिसत आहेत.

टोमॅटोची १० टन पेक्षा अधिक आवक होत असून, किरकोळ विक्रीत १० रुपयांत दोन किलो टोमॅटो विकले जात आहे. मध्य प्रदेश व उत्तर परदेशातून मटारची आवक होत आहे. २० रुपये किलोने मटार विकली जात आहे. कोथिंबीर तर १० रुपयांत ४ गड्डी विकत आहे. निर्यात बंदी उठविल्याने मागील आठवड्यात कांद्याचे भाव १० रुपयांनी वधारून ४० रुपये किलो झाले आहेत.

चौकट

भाजी। १० ते १७ जानेवारी

( किलो )

कांदा। ३० रु. ४० रु.

वटाणे। ३० रु। २० रु

बटाटे। २० ते ३० रु। २० ते ३० रु

कोथिंबीर। ५ रु ( गड्डी) २ रु ( गड्डी)

चौकट

खाद्यतेल १० जानेवारी १७ जानेवारी

( लिटर )

सोयाबीन तेल १२४ रु. १२० रु.

सरकी तेल १२४ रु. १२० रु.

पामतेल। ११४ रु.। ११२ रु.

करडीतेल। १८० रु.। १८० रु.

------

चौकट

आयात शुल्क घटले

मागील आठवड्यात आयात शुल्क १० टक्के कमी झाले, या बातमीमुळे सोयाबीन तेल, सरकी तेल व पामतेलाच्या भावात घट झाली. पॅकिंगमधील तेलाचे भाव कमी झाले.

श्रीकांत खटोड

व्यापारी

---

कोथिंबीर आणणे परवडेंना

कोथिंबीर एक ते दोन रुपये गड्डी विकत आहे. शेतातून काढून आणणे परवडत नाही. भाज्यांचे उत्पादन जास्त झाल्याचा परिणाम

अंबादास वाघमारे

शेतकरी

---

पावभाजीवर ताव

पावभाजीसाठी लागणारे वटाणे, शिमला मिरची, पत्ता कोबी, टोमॅटो स्वस्त असल्याने घरोघरी पावभाजीचा बेत होत आहे. पालेभाज्या जास्त खाल्ल्या जात आहे.

गायत्री मिटकर

गृहिणी

Web Title: Slight decline in prices of soybean, sorghum and palm oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.