शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्मार्ट सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:04 AM2021-03-18T04:04:46+5:302021-03-18T04:04:46+5:30

औरंगाबाद : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एससीडीसीएल) जालना रोडवरील हायकोर्ट चौकात आकर्षक स्मार्ट सिग्नल सुरू केले. शहरातील इतर ...

Smart signals on major roads in the city | शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्मार्ट सिग्नल

शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्मार्ट सिग्नल

googlenewsNext

औरंगाबाद : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एससीडीसीएल) जालना रोडवरील हायकोर्ट चौकात आकर्षक स्मार्ट सिग्नल सुरू केले. शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरही लवकरच अशा पद्धतीचे सिग्नल उभारण्यात येणार आहेत.

शहरात ‘एससीडीसीएल’ने स्मार्ट सिग्नल बसविण्याचे काम हाती घेतले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई येथे वरळी केलेल्या प्रयोगामुळे हा उपक्रम प्रेरित झाला आहे. स्मार्ट सिग्नल केवळ शहरातील सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशानेच नाहीत, तर वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठीही उपयुक्त ठरणार आहेत. ‘एससीडीसीएल’ने दिलेल्या माहितीनुसार स्मार्ट सिग्नलची दृश्यमानता चांगली आहे. वाहनचालक १५० मीटरपासून वाहतुकीचे दिवे पाहू शकतील आणि त्यानुसार वाहनाचा वेग मर्यादित करू शकतील. स्मार्ट सिग्नलमध्ये एक पोल आहे, जो कमानीसारखा रस्त्यावर येतो आणि त्यास एलईडी दिवे बसवले आहेत, जे ट्रॅफिक सिग्नलचा सिंक्रोनाइझेशनमध्ये प्रकाशित होते. ‘एएससीडीसीएल’ने जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास आणि व्हीआयपी रोडवरील जंक्शनवर असे स्मार्ट सिग्नल बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Smart signals on major roads in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.