चिंचोलीत शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांना स्मार्टफोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:05 AM2021-09-04T04:05:31+5:302021-09-04T04:05:31+5:30
जि. प. शाळेतील विद्यार्थी अनिकेत बंडू बोडखे व रविना महेंद्र सिरसाठ हे इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या गुणाने उत्तीर्ण ...
जि. प. शाळेतील विद्यार्थी अनिकेत बंडू बोडखे व रविना महेंद्र सिरसाठ हे इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले. याबद्दल गावचे सरपंच ज्ञानेश्वर दुधारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन भेट देण्यात आला. तसेच या परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सहशिक्षक धनंजय भामरे यांचाही सत्कार सरपंच ज्ञानेश्वर दुधारे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल बोडखे, मुख्याध्यापक संजय वैष्णव, रामनाथ बोडखे, महेंद्र सिरसाठ, रेखा पगारे, कारभारी वरकड, राजू लहाने आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : चिंचोली जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मार्ट फोन देऊन सत्कार करताना सरपंच ज्ञानेश्वर दुधारे, विठ्ठल बोडखे, संजय वैष्णव.
030921\fb_img_1630662705707.jpg
चिंचोली जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मार्ट फोन देवून सत्कार करतांनी सरपंच ज्ञानेश्वर दुधारे, विठ्ठल बोडखे, संजय वैष्णव.