जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षकांचे ‘स्माईल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:05 AM2021-09-21T04:05:52+5:302021-09-21T04:05:52+5:30
-- औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षकांनी एकत्र येत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सुरू केलेल्या स्माईल फाऊंडेशनचे उद्घाटन ...
--
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षकांनी एकत्र येत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सुरू केलेल्या स्माईल फाऊंडेशनचे उद्घाटन व आनंदमाला कृतीपुस्तिकेचा प्रकाशन समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर येथे उत्साहात पार पडला.
जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, मधुकर वालतुरे, अधिव्याख्याता डॉ. विशाल तायडे, डॉ. रवी जाधव, प्रकाश दाणे, विजय साळकर यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, जिल्हा परिषद लाईव्ह उपक्रमाची टिम, शिक्षक उपस्थित होते. यावेळी फाऊंडेशनच्यावतीने आदर्श शिक्षकांचा सत्कार व फाऊंडेशनचा ब्लॉग व यू ट्यूब चॅनलचे उद्घाटन करण्यात आले. स्माईल फाऊंडेशनचे संयोजक त्र्यंबकेश्वर पाटील यांनी फाऊंडेशन स्थापन करण्याचा उद्देश स्पष्ट केला. अनिल शहाणे, गणेश गव्हाणे यांनी सूत्रसंचालन तर संतोष पवार यांनी आभार मानले.
--
आनंदमाला कृतीपुस्तिकेची निर्मिती
--
पहिली-दुसरीच्या मुलांना मूलभूत वाचन व लेखन यावे यासाठी दर्जेदार कृतीपुस्तिकेची निर्मिती स्माईल फाऊंडेशनच्या मराठी टीमने केली. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी ही कृतीपुस्तिका प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक तो आर्थिक भार उचलण्याची ग्वाही सभापती गलांडे यांनी दिली.