घोरपडीची शिकार व तस्करीही
By Admin | Published: July 30, 2014 12:39 AM2014-07-30T00:39:18+5:302014-07-30T01:01:32+5:30
रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरात सध्या घोरपडीची शिकार करून तिची तस्करी करण्याचे प्रकार वाढले असल्याने घोरपडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरात सध्या घोरपडीची शिकार करून तिची तस्करी करण्याचे प्रकार वाढले असल्याने घोरपडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
रोहिलागड परिसर डोंगराळ तसेच खडकाळ आहे. परिसरात शासकीय गायरान जमीन मोठ्या प्रमाणात आहेत. डोंगराच्या पायथ्याशी ही जमीन असल्याने गायरान वनात घोरपड, ससे, तितर, लाहुरी, मोर आदी पशुपक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच या परिसरात शिकाऱ्यांचे चांगलेच फावते आहे. घोरपडीची शिकार करण्यासाठी शिकारी टिकास, फावडे, कुदळ घेऊन सकाळीच निघतात. घोरपडीपाठोपाठ ससे व तितरचाही शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसापासून या परिसरात घोरपडीची शिकार मोठ्या प्रमाणत होत आहे. तिच्या तस्करीतून चांगली रक्कम मिळत असल्याने हा व्यवसाय सद्धा परिसरात तेजीत आहे.
परिसरारात डोंगर माथ्यावर तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात घरपडी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही स्थानिक तसेच बाहरेगावचे शिकारी येथे असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)
कारवाई करण्याची वन्यप्रेमींची मागणी
रोहिलागड परिसरातील जंगलातून घोरपड व अन्य पशु पक्ष्याची शिकार होत आहे. अवैधरीत्या वृक्षतोडीही होत आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरातील वन्य जिवांची शिकार थांबवावी अशी मागणी वन्यप्रेमींतून होत आहे.