फ्रेंडशिप बँड खरेदी करताना वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:04 AM2021-08-01T04:04:47+5:302021-08-01T04:04:47+5:30

औरंगाबाद : ५०० रुपयांच्या नोटेचे सुट्टे पैसे मागण्यासाठी जनरल स्टोअरवर दोन युवक आले होते. त्यानंतर १५ मिनिटांनी परत येत ...

Snatched the old woman's gold chain while buying a friendship band | फ्रेंडशिप बँड खरेदी करताना वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली

फ्रेंडशिप बँड खरेदी करताना वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली

googlenewsNext

औरंगाबाद : ५०० रुपयांच्या नोटेचे सुट्टे पैसे मागण्यासाठी जनरल स्टोअरवर दोन युवक आले होते. त्यानंतर १५ मिनिटांनी परत येत त्यांनी फ्रेंडशिप बेल्टची मागणी केली. हा फ्रेंडशिप बेल्ट देतानाच वृद्धेच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची दीड तोळे वजन असलेली सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अरिहंतनगरमध्ये घडली आहे.

अरिहंतनगर येथे अरिहंत जनरल स्टोअर्स दुकान आहे. या दुकानात चंपाबाई पूनमचंद पाटणी (वय ७५, नाथनगर, अरिहंतनगर) दुपारी तीन वाजता बसल्या होत्या. दुकानातील नातेवाईक जेवणासाठी घरी गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. ३ वाजून १५ मिनिटांनी दोघेजण काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून किराणा दुकानात आले. त्यांनी ५०० रुपयांचे सुटे पैसे मागितले. दुकानातील चंपाबाई यांनी सुटे पैसे नसल्याचे सांगितल्यामुळे ते निघून गेले. त्यानंतर १५ मिनिटांनी ते दोघे परत दुकानात आले. त्यांनी फ्रेंडशिप बेल्ट आहेत का? असे विचारले. तेव्हा दोघांपैकी एकजण दुचाकीवर जाऊन बसला. दुसरा फ्रेंडशिप बेल्ट कापून देत असलेल्या वृद्ध महिलेकडे पाहत होता. फ्रेंडशिप बेल्ट घेऊन महिला काउंटरवर येताच तयारीत असलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या वृद्धेने तीन मिनिटांनंतर आरडाओरड केली. तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून पोबारा केला होता. या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना देताच निरीक्षक संतोष पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही धाव घेत परिसराची पाहणी केली. या प्रकरणी चंपाबाई पाटणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर करीत आहेत.

चौकट,

सीसीटीव्हीत चोरटे कैद

घटना घडलेल्या जनरल स्टोअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. दुकानाच्या जवळील परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत करीत तपास सुरू केला आहे.

Web Title: Snatched the old woman's gold chain while buying a friendship band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.