३० पेक्षा अधिक मंगळसूत्रे हिसकावणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:05 AM2021-09-24T04:05:32+5:302021-09-24T04:05:32+5:30

जावेद इराणी एमपीडीएखाली स्थानबद्ध शहर पोलिसांची कारवाई : राज्यभरात ३५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल औरंगाबाद : महाराष्ट्रासह ...

Snatching more than 30 mangalsutras | ३० पेक्षा अधिक मंगळसूत्रे हिसकावणारा

३० पेक्षा अधिक मंगळसूत्रे हिसकावणारा

googlenewsNext

जावेद इराणी एमपीडीएखाली स्थानबद्ध

शहर पोलिसांची कारवाई : राज्यभरात ३५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल

औरंगाबाद : महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात मंगळसूत्रे चोरी करणारा कुख्यात गुन्हेगार जावेद ऊर्फ लंग अली इराणी (३०, रा. पापानगर, रजा टॉवर, भुसावळ, जि. जळगाव) यास वाढत्या कारवायांमुळे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार कायद्यानुसार (एमपीडीए) हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले. जावेद इराणी याच्याविरोधात राज्यभरात ३५ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

जावेद इराणीवर जबरी चोरी, फसवणूक, बनावट दस्तऐवज खरा दाखवून फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही जावेदवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरीही त्याचे गुन्हे करणे थांबत नव्हते. यामुळे त्यास एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला. पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचेे निरीक्षक अविनाश आघाव, जवाहरनगरचे निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक अजित दगडखैर, सहायक उपनिरीक्षक द्वारकादास भांगे, नाना हिवाळे, शिपाई आशा केंद्रे, दीपाली सोनवणे, महादेव दाणे यांच्या पथकाने जावेद यास २३ सप्टेंबर रोजी स्थानबद्ध केले.

चौकट,

असे आहेत गुन्हे दाखल

२०२१ मध्ये जावेद इराणी याच्यावर औरंगाबादेतील उस्मानपुरा, सातारा, जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय परभणीतील मोंढा, धुळ्यातील शिरपूर ठाण्यातही गुन्हे नोंदविले. २०१८ मध्ये अंबाजोगाई, २०१५ -नाशिकमध्ये दोन, २०१३ - पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ८, जळगाव जिल्ह्यात १५ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय नगर, पालघर जिल्ह्यांत मंगळसूत्रे चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

Web Title: Snatching more than 30 mangalsutras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.