... म्हणून औरंगाबादच्या कार्यक्रमाला आले, पंकजांनी फडणवीसांच्या फोनबद्दलही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 02:19 PM2023-01-03T14:19:32+5:302023-01-03T14:21:17+5:30

औरंगाबादेतील कार्यक्रम हा पूर्णपणे भाजपचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा शासनाशी काहीही संबंध नव्हता

... So came to the program in Aurangabad, Pankaj Munde also told about Devendra Fadnavis' phone | ... म्हणून औरंगाबादच्या कार्यक्रमाला आले, पंकजांनी फडणवीसांच्या फोनबद्दलही सांगितलं

... म्हणून औरंगाबादच्या कार्यक्रमाला आले, पंकजांनी फडणवीसांच्या फोनबद्दलही सांगितलं

googlenewsNext

भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी शनिवारी बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला दांडी मारली होती. या सगळ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच औरंगाबाद येथील भाजपच्या कार्यक्रमात पंकजा यांनी उपस्थिती दर्शवली आणि भाषणही केलं. त्यामुळे, पंकजा मुंडें पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आता, औरंगाबादमधील कार्यक्रमाला आपण का गेलो हेही पंकजा यांनी स्पष्ट केलं. तसेच, बीडमधील कार्यक्रमाला का नव्हते आणि याबाबत देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन बोलणं झाल्याचंही त्यांनी म्हटलं.  

औरंगाबादेतील कार्यक्रम हा पूर्णपणे भाजपचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा शासनाशी काहीही संबंध नव्हता. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा येणार, ते माझे अध्यक्ष आणि मी सविच आहे. त्यामुळे, जेवढा तो कार्यक्रम त्यांचा तेवढाच माझा आणि तेवढाच तो कार्यक्रम भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे, मला वाटतं बोलावलं की नाही या चर्चा निरर्थक आहेत. मला नड्डा यांच्या ऑफिसमधूनच हा दौरा असल्याची दोन दिवसांपासून माहिती प्राप्त झाली. त्यामुळे, मी या कार्यक्रमाला येणार नाही हा प्रश्न कोणी निर्माण केला हे मला माहिती नाही, असे पंकजा मुंडेंनी म्हटलं. 

मला कोणी निमंत्रण देण्याची आवश्यकताच नाही, कारण हा कोणाचा लग्नसोहळा किंवा वैयक्तिक कार्यक्रम नाही, हा भाजपचा कार्यक्रम आहे. सगळ्या बॅनरवर मी आहे, सगळ्या जाहिरातीत मी आहे, स्टेजवर माझ्यासाठी स्वतंत्र खुर्ची होती, असे म्हणत पंकजा यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमातील उपस्थितीबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडली. तर, बीडमधील कार्यक्रम हा पक्षाचा नव्हता, तो कार्यक्रम एका विशिष्ट संघटनेचा होता म्हणून मी बीडमधील कार्यक्रमाला नव्हते. मात्र, देवेंद्रजींशी माझं फोनवरुन बोलणं झाल होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की, मी बीडला येत आहे. मात्र, मी बाहेरगावी असल्याने मला त्यांनीही केवळ एका तासासाठी ये-जा न करण्याचं सूचवलं, असेही पंकजा यांनी सांगितले. 

भाजप- बाळासाहेबांची शिवसेना युतीचे रणशिंग

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जाहीर सभेत भाजपाने सोमवारी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्याचे रणशिंग फुंकले. शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खा. इम्तियाज जलील यांचे नाव न घेता सभेमध्ये टीका करण्यात आली. बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती करून भाजपा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
 

Web Title: ... So came to the program in Aurangabad, Pankaj Munde also told about Devendra Fadnavis' phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.