...तर कदाचित तिचे मूल वाचले असते ...जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:02 AM2021-04-17T04:02:06+5:302021-04-17T04:02:06+5:30
मार्गदर्शक तत्त्वाचा अवलंब अनिवार्य सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणात आरोपीच्या अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात अहवाल ...
मार्गदर्शक तत्त्वाचा अवलंब अनिवार्य
सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणात आरोपीच्या अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात अहवाल सादर करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. क्रिमीनल मॅन्युअल आणि जेल मॅन्युअलनुसारही या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करणे अनिवार्य आहे.
चौकट_२
तुरुंगात बालकाचा जन्म टाळला पाहिजे
शक्यतो तुरुंगात बालकाचा जन्म टाळला पाहिजे. आरोपीची तुरुंगाबाहेर प्रसुती व्हावी, यासाठी तिला तात्पुरता जामीन, पॅरोल अथवा शिक्षा तात्पुरती निलंबित करता येऊ शकते, अशी महत्वपूर्ण मार्गदर्शक तत्वे न्या. कृष्णा अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील महिला कैदीविषयक राष्ट्रीय तज्ज्ञ समितीने घालून दिली आहेत. त्याचप्रमाणे न जन्मलेले प्रत्येक बालक दुष्कृत्यापासून अनभिज्ञ असते. आरोपीच्या कोठडीमुळे त्याला अकारण स्थानबध्दतेला तोंड द्यावे लागू नये, असे दिल्ली उच्च न्यायालयाने जामिया मिलिया इस्लामिया येथील विद्यार्थिनी सफुरा झरगर प्रकरणात म्हटले आहे.
चौकट_३
महिला डॉक्टरांचे मत
या सहआरोपी महिलेला दोन महिन्यांपूर्वीच जामीन मिळाला असता तर ती तिच्या घरी वैद्यकीय उपचार, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेऊ शकली असती. मानसिक ताण तणावापासून मुक्त राहिल्यामुळे तिच्या गर्भातील भ्रूणाची योग्य प्रकारे वाढ होऊन तिला मातृत्त्वाचे सुख प्राप्त झाले असते, असे महिला डॉक्टरांचे मत आहे.