...तर लाॅकडाऊनशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:03 AM2021-03-07T04:03:21+5:302021-03-07T04:03:21+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गाेंदावले : ग्रामीणमध्येही वाढताहेत शंभरपेक्षा अधिक रुग्ण, नियम पाळण्याचे आवाहन --- औरंगाबाद : जिल्ह्यात ...
मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गाेंदावले : ग्रामीणमध्येही वाढताहेत शंभरपेक्षा अधिक रुग्ण, नियम पाळण्याचे आवाहन
---
औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण भागातही शंभरपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. शहरातून ग्रामीणमध्ये ये-जा करणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नागरिक मास्क, अंतर पाळण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे असून त्यांनी न घेतल्यास खबरदारीचे उपाय प्रशासनाला योजावे लागतील. रविवारी जिल्हाधिकारी येतील त्यांच्यासमवेत बैठक होऊन यासंदर्भात निर्णय घेऊ, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी सांगितले.
लाॅकडाऊनच्या निर्णयासंदर्भात डाॅ. गोंदावले यांना विचारले असता ते म्हणाले, रविवारी जिल्हाधिकारी रुजू होतील. त्यांच्यासोबत प्रशासनाची बैठक होऊन लाॅकडाऊनसंदर्भात निर्णय होईल. शंभरपेक्षा अधिक रुग्ण ग्रामीण भागात शनिवारी आढळून आले. औरंगाबाद शहरातून ग्रामीण भागात ये-जा करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. त्या सर्व बाबींचा विचार करून निर्णय होईल. प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय हे समोर आहे. त्याचे कारणही नागरिक इकडे तिकडे नियम न पाळता फिरताहेत. लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, त्यांनी मास्क, सुरक्षित अंतर या सूचनांचे पालन केले पाहिजे. अशीच जर रुग्णांची संख्या वाढत राहिली, तर लाॅकडाऊनशिवाय दुसरा काही पर्याय शिल्लक राहणार नाही.