भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने राखले सामाजिक भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:02 AM2021-07-15T04:02:26+5:302021-07-15T04:02:26+5:30
वरिष्ठ आवेदन अभियंता मनोज सुरडकर यांनी सूत्रसंचालन, दीपाली खोबरे यांनी प्रास्ताविक केले. रक्तदात्यांचा सत्कार यावेळी रोपे देऊन करण्यात ...
वरिष्ठ आवेदन अभियंता मनोज सुरडकर यांनी सूत्रसंचालन, दीपाली खोबरे यांनी प्रास्ताविक केले. रक्तदात्यांचा सत्कार यावेळी रोपे देऊन करण्यात आला. सामाजिक बांधिलकीतून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शिबिर घेण्यात आले. वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रकाश शेलार, डॉ. कैलाश आहेर, सुनील महाजन, शरद गायकवाड, संजय पाटील, श्रीकृष्ण लांब, एस. एस. हिरवे, ए. एस. कचरे, व्ही. जी. सुकाळे, गौतम शिंदे, शैलेश राठोड, अशोक बेले, रुपाली शिंदे, माधुरी पटारे, विनोद पवार, आरिफ मिन्हाज, विशाल पांढरे, ऋषिकेश भालेराव, इंदिराकान्त भालेराव, व्ही. एन. पागे आदी उपस्थित होते. घाटी रुग्णालयाच्या विभागीय रक्तपेढीचे डॉ. आकाश आर्य, डॉ. दीपमाला कलांडे, डॉ. ज्योती हाके, जनसंपर्क अधिकारी सुनीता बनकर यांनी रक्तसंकलनासाठी सहकार्य केले.