समाजकल्याण अधिकारी अटकेत

By Admin | Published: September 20, 2014 12:26 AM2014-09-20T00:26:24+5:302014-09-20T00:29:14+5:30

औरंगाबाद : लाच मागणाऱ्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडेला अटक केली.

Social Welfare Officer detained | समाजकल्याण अधिकारी अटकेत

समाजकल्याण अधिकारी अटकेत

googlenewsNext

औरंगाबाद : शाळेच्या अनुदानाचा प्रस्ताव छाननी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यासाठी संस्था चालकाकडून ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडेला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तिच्यासाठी लाच स्वीकारणारी शिक्षिका संगीता अनिल पाटील (कोलते) हिलाही अटक करण्यात आली आहे.
या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, अखिल महाराष्ट्र ग्रामीण विकास मंडळ व अक्षर विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाचालक पटेल हे कन्नड, सिल्लोड व जटवाडा परिसरात आपल्या संस्थेच्या माध्यमातून अपंग आणि मतिमंदांसाठी शाळा चालवितात. पटेल यांनी आपल्या चार शाळांना शासनाकडून पायाभूत सोयी-सुविधांसाठी अनुदान मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव छाननीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे पाठविला होता.
पैसे दिले तरच प्रस्ताव
बरेच दिवस झाले, समाजकल्याण विभागातून हा प्रस्ताव छाननी करून मिळेना. म्हणून पटेल यांनी समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडेची भेट घेतली. तेव्हा हे चारही शाळांचे प्रस्ताव छाननी करून पाठविण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे ४० हजार रुपये द्या, तर प्रस्ताव पाठविते, असे सोनकवडेने सांगितले. हे पैसे शिक्षिका संगीता पाटील (कोलते) हिच्याकडे देण्यास सांगितले. संगीता पाटील ही सिल्लोड येथील अपंग निवासी विद्यालयात कार्यरत आहे. सोनकवडे आणि संगीता या दोघी मैत्रिणी आहेत. पटेल यांनी दोघींना पैसे आणून देतो, असे सांगून तेथून सरळ लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले आणि तक्रार केली. त्यावरून या दोघींना पकडण्याची योजना आखण्यात आली. ठरल्यानुसार पुन्हा पटेल यांनी सोनकवडेशी संपर्क साधला. तेव्हा तिने संगीताकडे ४० हजार रुपये द्या, काम होऊन जाईल, असे सांगितले.

Web Title: Social Welfare Officer detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.