टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत सोलापूर, सांगलीला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:09 AM2019-01-29T00:09:47+5:302019-01-29T00:10:20+5:30

: परभणी संघाने सोमवारी आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत चार गटांत उपविजेतेपद पटकावले. मुलांच्या युथ गटात सोलापूर अजिंक्य ठरला, तर मुलींमध्ये सांगली अजिंक्य ठरला. मिनी गटात मुलांमध्ये मुंबई आणि मुलींच्या गटात सांगली अजिंक्य ठरला.

Solapur, Sangli winners of tennis volleyball tournament | टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत सोलापूर, सांगलीला विजेतेपद

टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत सोलापूर, सांगलीला विजेतेपद

googlenewsNext

औरंगाबाद : परभणी संघाने सोमवारी आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत चार गटांत उपविजेतेपद पटकावले. मुलांच्या युथ गटात सोलापूर अजिंक्य ठरला, तर मुलींमध्ये सांगली अजिंक्य ठरला. मिनी गटात मुलांमध्ये मुंबई आणि मुलींच्या गटात सांगली अजिंक्य ठरला.
मुलांच्या युथ गटात सोलापूरने परभणीवर २-0 अशी मात केली. नाशिकचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मुलींच्या गटात सांगलीने परभणीवर २-0 अशा सेटने मात केली. मिनी मुलांच्या गटात मुंबईने परभणीवर २-१ असा विजय मिळवला. मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात सांगलीने परभणीवर २-0 अशी मात
केली.
मुंबईला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. बक्षीस वितरण नितीन लाहोट, शिक्षणाधिकारी वंदना वाहूळ, डॉ. व्यंकटेश वांगवाड, टेनिस व्हॉलीबॉल महासंघाचे उपाध्यक्ष जनक टेकाळे, जे. पी. अधाने, सुंदर गाडेकर, दामोदर दळवी, कलीमउद्दीन फारुखी, शैलेंद्र गौतम, आयोजन समिती सचिव गणेश माळवे यांच्या उपस्थितीत झाले. पंच म्हणून प्रफुल्ल बनसोड, सतीश नावाडे, किरण घोलप, गणेश पाटील, संतोष शिंदे, सुनील हिवाळे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागेश कान्हेकर, कैलाश टेहरे, प्रदीप काळे, उत्तरेश्वर शिंदे, लघू घरजाळे, प्रशांत शेळके, राजे वाघ, परमेश्वर खरात, माधव कदम, तुकाराम शेळके, जिजाभाऊ डख, संजय ठाकरे, प्रसेनजित बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Solapur, Sangli winners of tennis volleyball tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.