सौरदिव्यांना पुन्हा १.0२ कोटी
By Admin | Published: March 17, 2016 12:02 AM2016-03-17T00:02:47+5:302016-03-17T00:05:06+5:30
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला सौरदिव्यांसाठी पुन्हा १.0२ कोटी रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे.
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला सौरदिव्यांसाठी पुन्हा १.0२ कोटी रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे. जुन्या निविदांच्या प्रक्रियेबाबत तारांकित प्रश्न विचारण्यापर्यंत प्रकार घडल्यानंतर पुन्हा जिल्हा नियोजन समितीने पुनर्विनियोजनात हा निधी दिला आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत गेल्या वर्षीच्या १ कोटींच्या निधीबाबत काही दिवसांपूर्वी ई-निविदा प्रक्रिया झाली. त्यात वाढीव दराने ही निविदा मंजूर केल्याचा आरोप करून आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर जि.प. शिवसेनेच्या ताब्यात असताना होत असलेल्या या प्रकाराबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. सेनेच्याच लोकांकडून आपल्याच पदाधिकाऱ्यांवर अविश्वास दाखविला जात असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर काही प्रमाणात दरही कमी झाल्याची चर्चा आता रंगत आहे. मात्र नव्याने १.0२ कोटी मिळाल्याने आता सौरदिव्यांसाठी एकूण १.२७ कोटी रुपयांचा निधी झाला आहे.
यावेळीही तो मार्चपर्यंत खर्च होणार नसल्याने व पन्नास लाखांपेक्षा जास्त निधी असल्याने ई-निविदेद्वारेच खर्च करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.