नागरी समस्या सोडवा, अन्यथा कॉंग्रेसतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:05 AM2021-01-13T04:05:01+5:302021-01-13T04:05:01+5:30
यावेळी शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप ...
यावेळी शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांची उपस्थिती होती.
त्यांनी सांगितले की, शहराची जुनी कार्यकारिणी बरखास्त झालेली नाही. लवकरच ११५ वाॅर्डांचे अध्यक्ष जाहीर करण्यात येणार आहेत. आम्हाला भावनिक प्रश्नांपेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. औरंगाबाद की संभाजीनगर याबद्दल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जी भूमिका मांडली, तीच आमचीही भूमिका असून, आम्ही सर्व ११५ वाॅर्डांची मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहोत, असे उस्मानी यांनी स्पष्ट केले. येत्या आठ दिवसांत शहागंजातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या झाकून ठेवलेल्या पुतळ्याचे मनपाने अनावरण केले नाही तर आम्ही कॉंग्रेसतर्फे अनावरण करून टाकू, असा इशारा यावेळी देण्यात आला. मनपातर्फे बीओटी तत्त्वावर झालेल्या बांधकामांची चौकशी करण्यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यावर इक्बालसिंग गिल, सुभाष देवकर, डॉ.अरुण शिरसाट, एम.ए.अजहर आदींची नावे आहेत.