काही राजकीय नेत्यांना पागलखान्यात ठेवावे, विरोधकांचे स्क्रीनिंग करावे: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 05:49 AM2023-08-14T05:49:11+5:302023-08-14T05:49:28+5:30
विचारांचे प्रदूषण कमी होईल, सुसंवादाचे वातावरण तयार होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : राज्यात जे नेते टीव्हीवर बोलतात, त्यांचेही स्क्रीनिंग करून त्यांच्यातले काही रुग्ण महाआरोग्य शिबिरातील मानसोपचारतज्ज्ञांकडे आणले तर राज्याच्या आरोग्याचे भले होईल. विचारांचे प्रदूषण कमी होईल, सुसंवादाचे वातावरण तयार होईल. त्यांची तपासणी केल्यावर त्यांना काही काळ पागलखान्यात ठेवावे लागेल, अशी उपरोधिक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, सहापटींनी आरोग्य सेवेचे बजेट वाढले आहे. पंतप्रधानांच्या काळात ३४७ वरून ६०७ वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे.