कधी दुष्काळ तर कधी कोरोनाचे सावट, वेरूळ-अजिंठा महोत्सवाला दशकापासून घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 02:07 PM2021-12-30T14:07:17+5:302021-12-30T14:10:12+5:30

Ellora-Ajanta festival : मागील २१ वर्षांत केवळ सात वेळा झाला महोत्सव

Sometimes drought, sometimes epidemics, Ellora-Ajanta festival has been delayed from decades | कधी दुष्काळ तर कधी कोरोनाचे सावट, वेरूळ-अजिंठा महोत्सवाला दशकापासून घरघर

कधी दुष्काळ तर कधी कोरोनाचे सावट, वेरूळ-अजिंठा महोत्सवाला दशकापासून घरघर

googlenewsNext

- विकास राऊत
औरंगाबाद : वेरूळ-अजिंठा महोत्सवाला ( Ellora-Ajanta festival) दशकापासून घरघर लागली आहे. २०११ आणि २०१६ हे दोन वर्ष वगळले तर १३ वर्षांत १० वेळा हा महोत्सव रद्दच करावा लागला.

अजिंठा-वेरूळ महोत्सवाला आता कोरोनाची साथ पूर्णत: गेल्यावरच मुहूर्त लागेल असे चित्र दिसते आहे. वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी होणारा हा महोत्सव २००१ पासून विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात घेण्यास सुरुवात झाली. २००७ पर्यंत हा महोत्सव नियमितपणे झाला. त्यानंतर कोणत्या न कोणत्या कारणामुळे हा महोत्सव आयोजित होऊ शकला नाही. मराठवाड्याच्या राजधानीत होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाकडे आजवर कधीही गांभीर्याने न पाहिल्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचा ऱ्हास झाला आहे.

२००८ ते २०२१ या १३ वर्षांत फक्त दोनदा महोत्सव झाला. २०१७ साली महोत्सवाची पूर्ण तयारी झाली होती, परंतु ऐनवेळी महोत्सव रद्द करण्यात आला. औरंगाबादसह मराठवाडा दुष्काळाच्या छायेत होता. त्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचे कार्यक्रम आयोजित करावे की न करावे, यावरून प्रशासन शासनाकडे गेले होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करूच नये, असा अभिप्राय शासनाने दिल्यानंतर महाेत्सव रद्द करण्यात आला होता. २०१८ आणि २०१९ साली नियोजन झालेच नाही. तर २०२० मध्ये कोरोनाची लाट आल्यामुळे महोत्सवाचा प्रशासनाला विसरच पडला. २०२१ साली देखील तशीच अवस्था आहे.

जिल्हाधिकारी काय म्हणतात
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, ओमायक्रॉनमुळे गर्दीच्या कार्यक्रमांवर शासनाकडूनच निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे अजिंठा महोत्सव आणि कृषी प्रदर्शन तूर्तास पुढे ढकलले आहे. वेरूळ-अजिंठा महोत्सवाचा विचार कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर होऊ शकेल. परंतु सध्या कोणत्याही महोत्सवाचे आयोजन करणे शक्य नाही.

या कारणांनी हे वर्ष गेले महोत्सवाविना :
२००८- मुंबई दहशतवादी हल्ल्यामुळे रद्द
२००९- स्वाईन फ्ल्यूची साथ आल्याने रद्द
२०१०- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे रद्द
२०१३- दुष्काळामुळे महोत्सव रद्द
२०१४- दुष्काळामुळे महोत्सव रद्द
२०१५- दुष्काळी स्थितीमुळे रद्द
२०१७ - नियोजन होऊ शकले नाही
२०१८- दुष्काळामुळे महोत्सव घेणे योग्य नाही
२०१९-महोत्सव घेण्याचा निर्णयच झाला नाही
२०२०- कोरोनामुळे महोत्सव रद्द
२०२१- कोरोना, ओमायक्रॉनमुळे महोत्सवावर गदा

Web Title: Sometimes drought, sometimes epidemics, Ellora-Ajanta festival has been delayed from decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.