पोलीस येताच चोरीच्या दागिन्यांची पिशवी ठेवली गुपचूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:05 AM2021-02-21T04:05:57+5:302021-02-21T04:05:57+5:30
तक्रारदार आशा कौतिकराव निकाळजे (४५, रा. तक्षशीलानगर, सातारा) यांच्या मुलाचे लग्न असल्यामुळे घरी नातेवाईक आलेले आहेत. त्यांनी ...
तक्रारदार आशा कौतिकराव निकाळजे (४५, रा. तक्षशीलानगर, सातारा) यांच्या मुलाचे लग्न असल्यामुळे घरी नातेवाईक आलेले आहेत. त्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेला १० ग्रॅमची सोन्याची एकदाणी, २० ग्रॅम सोन्याची बोरमाळ, असा एकूण १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरीला गेला. ही बाब समजल्यावर आशा यांनी सातारा ठाणे गाठून तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेवाळे यांच्यासोबत विशेष पथकाचे अमलदार चौहान, लोंढे, जायभाये, सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. तेव्हा नातेवाइकांनी सदरची चोरी केल्याची खात्री त्यांची झाली. यामुळे त्यांनी सर्व नातेवाइकांना विश्वासात घेऊन विचारपूस सुरू केली. यानंतर काही वेळातच कोणीतरी चोरी केलेले सर्व सोन्याचे दागिने घराबाहेर एका पिशवीत आणून ठेवले. सर्व दागिने परत मिळाल्याबद्दल आशा यांनी पोलिसांचे आभार मानले.