आरक्षण जाहीर होताच गावागावांतील राजकारण तापले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:59+5:302020-12-11T04:21:59+5:30

नाचनवेल : सरपंचदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून पुन्हा एकदा गावागावांतील राजकीय वातावरण तापले आहे. नाचनवेल सर्कलमधील बहुतांश गावांतील ...

As soon as the reservation was announced, the politics in the villages heated up! | आरक्षण जाहीर होताच गावागावांतील राजकारण तापले !

आरक्षण जाहीर होताच गावागावांतील राजकारण तापले !

googlenewsNext

नाचनवेल : सरपंचदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून पुन्हा एकदा गावागावांतील राजकीय वातावरण तापले आहे. नाचनवेल सर्कलमधील बहुतांश गावांतील पारावरच्या गप्पांमध्ये रंगत वाढल्याचे चित्र दिसत आहे.

पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून ग्रामपंचायतीला ओळखले जाते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नुकतीच सरपंचपदाची आरक्षण सोडत करण्यात आली. प्रत्यक्ष निवडणुकीला दीड वर्षे वेळ असला तरी सरपंचपद पुन्हा जुन्याच पध्दतीने सदस्यांमधून निवडले जाणार असल्याने प्रत्येक सदस्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर गावागावांमध्ये राजकारण चांगलेच रंगले आहे. गावातील मातब्बर पुढारी पुन्हा कामाला लागले असून त्यांच्याविरोधात सुशिक्षित तरुणांचा गट समोर येऊ लागला आहे. त्यामुळे जुन्या-नवीन अशा राजकारणातील पिढीचा संघर्ष यावेळेला पहावयास मिळणार आहे.

Web Title: As soon as the reservation was announced, the politics in the villages heated up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.