आत्मा कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले
By Admin | Published: July 20, 2016 12:02 AM2016-07-20T00:02:56+5:302016-07-20T00:27:14+5:30
औरंगाबाद : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) अंतर्गत कार्यरत जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत.
औरंगाबाद : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) अंतर्गत कार्यरत जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. त्यामुळे सध्या हे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या हेतूने राज्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हास्तरावर या प्रकल्पाचे स्वतंत्र कार्यालय आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. मात्र चालू वर्षी निधी न मिळाल्यामुळे आत्माच्या जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. जिल्ह्यात आत्मा अंतर्गत एकूण चार अधिकारी आणि २२ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ९ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, १२ विषय विशेषतज्ज्ञ आणि १ कॉम्प्युटर प्रोग्राम यांचा समावेश आहे. या सर्वांना एप्रिलपासून आतापर्यंत पगार मिळालेला नाही. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. आत्माचे प्रकल्प संचालक एस. एम. सोळुंके यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, निधीअभावी पगार रखडले होते.
मात्र नुकताच ३३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे लवकरच या कर्मचाऱ्यांचे पगार होतील. केवळ कर्मचाऱ्यांचेच नव्हे तर अधिकाऱ्यांचेही पगार रखडले होते, असेही त्यांनी नमूद केले.