औरंगाबादकडे 'दक्षिण मध्य रेल्वेचा' कानाडोळाच; जनरल मॅनेजर नगरसोलहून थेट जालन्याकडे रवाना
By संतोष हिरेमठ | Published: September 25, 2022 03:46 PM2022-09-25T15:46:33+5:302022-09-25T15:47:38+5:30
दमरे'चे महाव्यवस्थापक आज जालना रेल्वेस्टेशनची आणि येथे सुरु असलेल्या पीटलाइनच्या कामाची पाहणी करणार आहेत.
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रविवारी
नगरसोलहून रेल्वेनेऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल झाले, मात्र काही मिनिटातच ते जालन्यासाठी रवाना झाले. दौऱ्यात औरंगाबादकडे पाठ फिरवल्याने रेल्वे संघटनांनी नाराजी व्यक्त केली.
'दमरे'चे महाव्यवस्थापक आज जालना रेल्वेस्टेशनची आणि येथे सुरु असलेल्या पीटलाइनच्या कामाची पाहणी करणार आहेत. ‘दमरे’चे जीएम अरुणकुमार हे आधी जालन्यात पीटलाइनच्या कामाची पाहणी करणार होते आणि या पाहणीनंतर ते नगरसोल येथे अतिरिक्त लूपलाईनच्या कामाची पाहणी करणार होते. मात्र यात बदल करत त्यांनी प्रारंभी नगरसोल येथे पाहणी केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर त्यांची रेल्वे दाखल झाली. ही रेल्वे काही मिनिटात औरंगाबादहून जाण्यासाठी रवाना झाली.