उंडणगाव शिवारात दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पेरण्यांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:05 AM2021-06-20T04:05:21+5:302021-06-20T04:05:21+5:30
दोन-तीन वर्षापासून पाऊस हा मृग नक्षत्रात पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या चांगल्या पद्धतीने झालेल्या होत्या. मात्र यंदा पहिल्यांदाच ...
दोन-तीन वर्षापासून पाऊस हा मृग नक्षत्रात पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या चांगल्या पद्धतीने झालेल्या होत्या. मात्र यंदा पहिल्यांदाच रोहिणी नक्षत्रात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. मृग नक्षत्रात तरी चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मृग नक्षत्रात पाहिजे तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. तोच तब्बल दहा दिवसानंतर गुरुवारी पाऊस झाला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून खऱ्या अर्थाने पेरण्यांना सुरूवात झाली आहे.
----
सोयाबीन पिकाचा पेरा वाढला
यंदा सोयाबीन पिकाचा पेरा वाढला आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदाही सोयाबीन लागवडीकडे कल वाढला आहे. तर मका व कपाशी लागवडीकडे शेतकऱ्यांनी कानाडोळा केला आहे, असे कृषी केंद्रचालक अतुल खंडेलवाल यांनी सांगितले.