यंदा सोयाबीन पेरताय, बक्कळ कमाईसाठी वापरा 'टोकन पेरा' पद्धत, कृषी विभागानेही दिला सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 05:58 PM2022-06-21T17:58:22+5:302022-06-21T18:00:30+5:30

खरीप हंगामात घरच्या बियाण्याला शेतकरी प्राधान्य देत आहेत

Soybeans are sown this year, use tokens to earn a lot of money | यंदा सोयाबीन पेरताय, बक्कळ कमाईसाठी वापरा 'टोकन पेरा' पद्धत, कृषी विभागानेही दिला सल्ला

यंदा सोयाबीन पेरताय, बक्कळ कमाईसाठी वापरा 'टोकन पेरा' पद्धत, कृषी विभागानेही दिला सल्ला

googlenewsNext

- योगेश पायघन
औरंगाबाद :
नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. मात्र बियाणे व उत्पादन खर्च वाढवून सोयाबीन पीक घेण्याबद्दल अनेक प्रयोग केले जात आहे. शेतकऱ्यांत मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून यावर्षी टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती सुरू आहे. महागड्या बियाण्यावरील खर्च कमी करून उत्पन्न वाढीसाठी टोकन पद्धतीवर शेतकऱ्यांचा अधिक भर आहे.

जिल्ह्यात खरीपाचे ६.५६ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र असून यावर्षी कपाशी ३.६१ लाख हेक्टर, मका १.७९ लाख हेक्टर, सोयाबीन ३३ हजार ८०० हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. २५ हजार २३० क्विंटल बियाण्याची आवश्यकता भासणार आहे. ग्राम बीजोत्पादन मोहिमेतून शेतकऱ्यांनी ६८०० क्विंटल बियाणे राखून ठेवले आहे. आतापर्यंत ३४०० क्विंटल बियाणे विक्री झालेली आहे. सोयाबीनची पेरणी पारंपरिक पद्धतीने न करता बीबीएफल सरी वरंभा किंवा टोकन पद्धतीने केल्यास अत्यंत फायदेशीर ठरते. टोकन पद्धतीने पेरणीत बियाण्याची बचत आणि उत्पन्नात ३० टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.

३४ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरा अपेक्षित
जिल्ह्यात खरीपाचे ६.५६ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र असून सोयाबीन ३३ हजार ८०० हेक्टरवर लागवड होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी साेयाबीनचा जिल्ह्यातील पेरा वाढण्याचा अंदाज आहे.

कोणत्या पेरणीचा किती फायदा?
पारंपरिक पेरणी : पारंपरिक पेरणीला आता शेतकऱ्यांकडून विराम मिळाला असून ट्रॅक्टरद्वारे किंवा बैलांद्वारे पेरणी केल्यावर त्यात बियाणे अधिक लागते. अंतर योग्य राहत नसल्याने उत्पादनात घट येते.
ट्रॅक्टरचलित बीबीएफ : ट्रॅक्टरचलित बीएफए टोकन पेरणीत खर्च कमी येतो. योग्य अंतर, खोलीवर पेरणी झाल्याने उगवण चांगली येते. रूंद सरी वरंभा पद्धतीमुळे जास्त पाऊस झाल्यास पाणी वाहून जाते तर कमी पावसात ओलावा कायम राहते.
बहुपीक पेरणी : यात आंतरपीक पद्धतीनुसार दोन पिके एकाच वेळी घेता येतात. तुरीसोबत साेयाबीन पेरणी कोरडवाहू भागातील शेतकरी करतात. सोयाबीन काढल्यावर तुरीचे पीक येते. मात्र, पेरणी व मजुरीचा खर्च अधिक आहे.
सरी वरंभ्यावर टोकन पद्धत : चार फुटापर्यंत सरी घेऊन दोन्ही बाजूने वरंभा करून वरंभ्यावर लागवड करतात. दोन रोपांमध्ये विशिष्ट अंतर ठेवले जाते. त्यामुळे आंतरमशागत चांगली करता येते.

Web Title: Soybeans are sown this year, use tokens to earn a lot of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.