सोयाबीन गाठणार पाच हजार रुपयांचा टप्पा; शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले आशेचे किरण
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 2, 2023 06:36 PM2023-11-02T18:36:29+5:302023-11-02T18:37:25+5:30
अनेक शेतकऱ्यांनी ‘थांबा आणि वाट पहा’ असे धोरण स्वीकारले आहे.
छत्रपती संभाजीनगर : आडत बाजारात सोयाबीनचे भाव थोडे वाढल्याने शेतकऱ्यांच्या मनात आशेचे किरण निर्माण झाले आहेत. आता ४८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव असले, तरी येत्या काही दिवसांत ५ हजारांपर्यंत भाव मिळू शकतो. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ‘थांबा आणि वाट पहा’ असे धोरण स्वीकारले आहे.
सोयाबीनचे दर का वाढले :
सोयाबीनला यंदा भाव मिळत नव्हता. ४५०० रुपये प्रतिक्विंटलच्या आत विकले जात होते. सोयाबीनसारख्या पिकांना भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय. निसर्गाच्या लहरीपणाच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार, अशी चिंता पसरली असताना मागील चार ते पाच दिवसांपासून सोयाबीनचे भाव वाढू लागले आहेत. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे भाव वधारले आहेत. परिणामी क्विंटलमागे १०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.
आणखी दीड ते दोन महिने होईल आवक
मागील १५ दिवसांपासून नवीन सोयाबीनची आवक जाधववाडीतील कृउबा समिती आडत बाजारात होत आहे. दररोज २६० ते ४०० क्विंटलपर्यंत सोयाबीन येत आहे. आज ४६०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. जाधववाडीतील सोयाबीन लातूर, धुळे, इंदापूर येथील सोयाबीन प्लांटवाले खरेदी करत आहेत.
- विजय पांडे, खरेदीदार