सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांवर मावा, तुडतुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:04 AM2021-07-04T04:04:26+5:302021-07-04T04:04:26+5:30

सोयगाव : खरिपाच्या हंगामात सोयगाव तालुक्यात बागायती आणि कोरडवाहू क्षेत्रावर २९,३९१ हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली आहे; मात्र ...

In Soygaon taluka, cotton crop is infested with powdery mildew | सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांवर मावा, तुडतुडे

सोयगाव तालुक्यात कपाशी पिकांवर मावा, तुडतुडे

googlenewsNext

सोयगाव : खरिपाच्या हंगामात सोयगाव तालुक्यात बागायती आणि कोरडवाहू क्षेत्रावर २९,३९१ हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली आहे; मात्र पावसाचा अधिकच्या खंड पडल्याने या दोन्ही प्रकारच्या कपाशी क्षेत्रावर मावा आणि तुडतुड्याच्या प्रादुर्भाव आढळून आल्याने फवारणीसाठी शेतकऱ्यांनी धावाधाव सुरू केली आहे. पावसाचा खंड आणि रोगांचा प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.

यंदाच्या खरिपाच्या हंगामात सोयगाव तालुक्यात कपाशीचे बियाणे उशिरा मिळूनही बागायती क्षेत्रावर १६४२६ हेक्टरवर आणि कोरडवाहू क्षेत्रावर १२९६५ हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली; मात्र पावसाच्या खंडामुळे कपाशी पिकांवर शनिवारपासून मावा आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव आढळून आल्याने सोयगावचा शेतकरी फवारणी साठी सज्ज झालेला आहे. त्यामुळे तालुक्यात पहिल्याच दिवशी तब्बल ८,७६९ हेक्टरवर फवारणी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती समोर आली. कोवळ्या वयातच कपाशी पिके मावा आणि तुडतुड्याच्या कचाट्यात सापडली आहे. त्यामुळे पुन्हा पिकांच्या वाढीची चिंता घोर लावून आहे.

----

कृषी विभागाचे झोपेचे सोंग अंगलट

तालुका कृषी विभागाने आठवड्यापासून झोपेचे सोंग घेतल्याने मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांच्या अंगलट आले आहे. मावा, तुडतुडे आणि पावसाच्या खंडमुळे शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शनाची गरज असताना कोणत्याही उपाय योजना मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

--

शासनाचे कृषक ॲपही बिनकामी

जिल्हा परिषद औरंगाबाद आणि कृषी विभाग यांच्या वतीने नुकतेच शेतकऱ्यांसाठी कृषक ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सदरील ॲप तातडीने आग्रहास्तव डाऊनलोड केले. मात्र, या ॲप्सच्या माध्यमातूनही अद्याप कोणतेही मार्गदर्शन मिळालेले नाही.

030721\1814-img-20210703-wa0053.jpg

सोयगाव-घोसला ता सोयगाव शिवारात फवारणीसाठी शेतकरी सज्ज

Web Title: In Soygaon taluka, cotton crop is infested with powdery mildew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.